Paddy Crop Damage  Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Crop Damage : सलग दुसऱ्या दिवशी पावसाने भाताचे नुकसान

Rain Update : ऐन दिवाळीच्या तोंडावर झालेल्या पावसाने भात उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Team Agrowon

Pune News : जिल्ह्याच्या पश्‍चिम घाट परिसरातील जुन्नर, खेड, आंबेगाव, मावळ, मुळशी, भोर, वेल्हा या भागांत गुरुवारी (ता.९) आणि शुक्रवारी (ता.१०) सलग दोन दिवस झालेल्या पावसाने कापणीस आलेला आणि काढणी झालेल्या भाताचे मोठे नुकसान झाले आहे.

ऐन दिवाळीच्या तोंडावर झालेल्या पावसाने भात उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

आंबेगाव तालुक्याच्या पश्‍चिम आदिवासी भागात सध्या भातकापणीचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे कापलेला भात शेतातच पडून होता. परंतु शुक्रवारी (ता. ९) सायंकाळी अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली.

शेतात पावसाचे पाणी साचल्याने भात भिजून गेला त्याबरोबरच भाताचा पेंढाही भिजून खराब झाल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. या अवकाळी पावसामुळे सुमारे ३ हजार हेक्टर क्षेत्रातील भाताचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज शेतकऱ्यानी वर्तविला आहे.

पश्‍चिम घाट परिसरातील कोंढवळ, राजपूर, फलोदे, तळेघर, चिखली, पोखरी, राजेवाडी, गोहे बुद्रुक, चिखली, जांभोरी, पाटण, पिंपरी, साकेरी, म्हाळुंगे, मेघोली, दिगद, कुशिरे, भोईरवाडी, कोंढरे, नानवडे, पिंपरगणे, असाणे, आघाणे, तिरपाड, डोण, आमडे, अडिवरे आदी गावांमध्ये शुक्रवारी (ता.११) सायंकाळी अवकाळी पावसामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

मुळशी तालुक्यातील मुठा खोऱ्यात गेल्या दोन दिवसांत झालेल्या पावसाने कापणीस आलेला आणि काढणी केलेला भात भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मुठा खोऱ्यातील लव्हार्डे, कोळावडे, भोडे, वांजळे, वातुंडे, सिद्धेश्‍वर, खारवडे, आंदगाव गावे व वाड्या वस्त्यातील शेतकऱ्यांनी भातकाढणी सुरू केली होती. गुरुवारी (ता. ९) आणि शुक्रवारी (ता. १०) झालेल्या पावसाने नुकसान झाले. भाताचा पेंढा भिजल्याने जनावरांचा वर्षभराच्या चाऱ्याचा प्रश्‍नदेखील निर्माण झाला आहे.

तत्काळ माहिती द्या

पीकविमा उतरविलेल्या शेतकऱ्यांनी १८००२६६०७०० या टोल फ्री क्रमांकावर किंवा क्रॉप इन्शुरन्स या ॲपवर आपल्या नुकसानीची माहिती तत्काळ द्यावी. तसेच विहित अर्जात माहिती तालुका कृषी अधिकारी कार्यालयात द्यावी. तसेच नुकसानीबाबत नजरअंदाज माहिती कळविण्यात आली असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Biochar Production: कर्ब संवर्धनासाठी पीक अवशेषांपासून बायोचार निर्मिती

Turmeric Farming: हळद, आले पिकांतील अन्नद्रव्ये व्यवस्थापन 

Armyworm in Maize: मक्यातील लष्करी अळीचा करा नायनाट; कीड व्यवस्थापनाची संपूर्ण माहिती

Great Indian Bustard: माळढोक अभयारण्याच्या राखीव क्षेत्रात सोडले घातक रसायन 

Lumpy Disease: मोहोळमध्ये ‘लम्पी स्कीन’ने दोन जनावरांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT