Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Rain News : पश्‍चिम विदर्भात पाऊस पुन्हा सक्रिय

Rain Update : मागील ४८ तासांत पश्‍चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशीम या तीनही जिल्ह्यांमध्ये पावसाने अनेक ठिकाणी जोरदार हजेरी दिली.

Team Agrowon

Akola News : मागील ४८ तासांत पश्‍चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशीम या तीनही जिल्ह्यांमध्ये पावसाने अनेक ठिकाणी जोरदार हजेरी दिली. सर्वच मंडलांमध्ये पाऊस होत आहे. सध्या पिकांना पावसापेक्षा अनेक ठिकाणी सूर्यप्रकाशाची गरज असताना हा पाऊस होत असून, आता नुकसानाची टक्केवारी वाढविणारा ठरेल, अशी चिंता शेतकरी व्यक्त करीत आहेत.

गेल्या आठवड्यात पावसाचा जोर कमी झाला होता. काही दिवस सूर्यप्रकाशही पिकांना मिळाला. पीकपरिस्थिती सुधारण्यास सुरुवात झाली असतानाच पुन्हा दोन दिवसांपासून या भागात सातत्याने पाऊस होत आहे. मागील २४ तासांत या जिल्ह्यांमधील सर्वच तालुक्यांना पावसाने झोडपून काढले. अकोला जिल्ह्यात तेल्हारा तालुक्यात हिवरखेड मंडलात सर्वाधिक ५९.५ मिलिमीटर पाऊस झाला.

हातरुण मंडलात ५५.८, आगर ५८.८, सिंदखेडराजा मंडलात ५६.३, शेगावमध्ये ६८.८, केकतउमरा मंडलात ६०.५, गिरोली ५६.३ असा जोरदार पाऊस नोंदविण्यात आला. या मंडलांमध्ये सरासरी ५० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे पिकांना फटका बसला. अनेक ठिकाणी नाल्यांचे पाणी शेतांमधून वाहले.

या पाण्यात पिके खरडून जाण्याचेही प्रकार अकोट तालुक्यात तरोडा, चोहोट्टा मंडलामध्ये समोर आले. सोयाबीनचे पीक फुलोऱ्यात, शेंगा लागण्याच्या स्थितीत असतानाच हा अतिपाऊस आता नुकसानदायी ठरू शकतो. पीक नुकसानीचा अंदाज यंत्रणास्तरावर घेतल्या जात आहे.

२४ तासांतील तालुकानिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये)

अकोला जिल्हा - अकोट २४.६ मिलिमीटर, तेल्हारा ३०.४, बाळापूर २७.४, पातूर २१.७, अकोला २९.१, बार्शीटाकळी २३.५, मूर्तिजापूर २१.६, बुलडाणा जिल्हा- जळगाव जामोद २०.३, संग्रामपूर २६.१, बुलडाणा १४.७, देऊळगावराजा १६, सिंदखेडराजा ३०, लोणार १५.७, खामगाव २२.४, शेगाव ३२.७, मोताळा १८.५,वाशीम जिल्हा ः वाशीम ३१.२, रिसोड १२.४, मालेगाव ३०, मंगरुळपीर २६.८, मानोरा ३७.२, कारंजा २४.५ मिलिमीटर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Someshwar Sugar Factory Election: सोमेश्वरच्या कारभाऱ्यांचा आज होणार फैसला; मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष

Dimbhe Dam Water Leakage: डिंभे धरणातून होतेय पाण्याची गळ

Paddy Farmer Bonus: धान उत्पादकांना हेक्टरी २० हजार बोनस द्या : मुनगंटीवार

Mumbai APMC File Case: मुंबई राष्ट्रीय बाजार समितीत फाइल पळविल्याचा आरोप

Sugarcane Price: साडेपाच हजारांच्या ऊसदराचे गणित साखरेच्या भावावर अवलंबून

SCROLL FOR NEXT