Rain News Agrowon
ॲग्रो विशेष

Rain News : सांगली, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची हजेरी

Sangli, Ratnagiri Rain Update : सांगली जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. मंगळवारी (ता. २७) सकाळपासून जिल्ह्यातील काही भागांत पावसाची रिमझिम झाली.

Team Agrowon

Today Rain Update : सांगली जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. मंगळवारी (ता. २७) सकाळपासून जिल्ह्यातील काही भागांत पावसाची रिमझिम झाली. दुपारनंतर ढगाळ वातावरण होते. पाऊस सुरू झाल्याने शेतकरी पेरणीची तयारी करू लागला आहे. शेतकरी अजूनही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

जिल्ह्यात पावसाने दडी मारली होती. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. कधी ढगाळ तर कधी ऊन असे वातावरण होत आहे. जिल्ह्यातील मिरज, पलूस, वाळवा या तालुक्यांसह अनेक ठिकाणी हलक्या पावसाने हजेरी लावली.

तर काही भागांत दुपारपर्यंत रिपरिप पाऊस झाला. जिल्ह्यात पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. खरीप हंगामातील पेरणी झालेल्या पिकांना नवसंजीवनी मिळाली असून, शेतकरी पेरणीसाठी नियोजन करू लागला आहे. मात्र अजूनही शेतकरी मोठ्या पावसाची प्रतीक्षा करत आहेत.

सिंधुदुर्गात पावसाचा जोर वाढल

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून मंगळवार (ता. २७) पहाटेपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. सोमवारी सकाळच्या सत्रात पाऊस होता मात्र दुपारनंतर कडक ऊन पडले होते.

जिल्ह्यात शनिवारी (ता. २४) मॉन्सूनचे जोरदार पुनरागमन झाले. त्यानंतर ३० जूनपर्यंत जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला होता. परंतु रविवारी (ता. २५) दुपारनंतर पावसाचा जोर कमी होण्यास सुरुवात झाली.

सोमवारी सकाळी काही भागात पावसाच्या सरी कोसळल्या परंतु दुपारनंतर कडक ऊन सर्व जिल्ह्यात होते. दरम्यान मंगळवार पहाटेपासून जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली. दुपारी बारानंतर पावसाचा जोर अधिकच वाढला असून जोरदार पाऊस सध्या जिल्ह्यात पडत आहे. या पावसामुळे शेतीच्या कामांना गती आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Red Sandalwood: लाल चंदन प्रकरणावर सहा महिन्यांत निर्णय घ्या

Farmer Support: टंचाईत शेतकऱ्यांना अडचणी भासू देऊ नयेत : पालकमंत्री बोर्डीकर

Farmer Support: गंभीर परिस्थितीत शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी : कृषिमंत्री भरणे

Drought Declaration Demands: प्रत्यक्ष नुकसानीच्या आधारे दुष्काळ जाहीर करा : झनक

Multi State Cooperative Society: एन साई मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीला ७ कोटी ९ लाखांचा नफा : ठोंबरे

SCROLL FOR NEXT