Rain Update  Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Update : सिंधुदुर्गात वादळी वाऱ्यांसह पाऊस

Latest Rain News : कोकण किनारपट्टी भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव अधिकच वाढला असून शनिवारी (ता. ३०) रात्रीपासून जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह पाऊस सुरू आहे.

Team Agrowon

Sindhudurg News : कोकण किनारपट्टी भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव अधिकच वाढला असून शनिवारी (ता. ३०) रात्रीपासून जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह पाऊस सुरू आहे. समुद्र खवळला असून मासेमारी ठप्प झाली आहे. वादळामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. हवामान विभागाने ‘रेड अलर्ट’ जाहीर केला असून प्रशासनानेही दक्षतेचा इशारा दिला आहे.

दक्षिण कोकण-गोवा किनाऱ्यालगत पूर्वमध्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे गेले दोन दिवस जिल्ह्याच्या किनारपट्टीसह उर्वरित भागात जोरदार पाऊस सुरू आहे. वाऱ्याचा वेगदेखील वाढला आहे. दरम्यान या कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे शनिवारी रात्रभर जिल्ह्याच्या बहुतांश भागांत वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस झाला.

दोडामार्ग, सावंतवाडी, वेंगुर्ला तालुक्यांना पावसाने झोडपून काढले. बांदा परिसरात वादळी पाऊस झाला. त्यामुळे अनेक घरांवर झाडे कोसळणे, वीज खांब पडणे, वीज वाहिन्या तुटून पडण्याचे प्रकार घडले. रविवारी (ता. १) पहाटेपासूनदेखील जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा जोर कायम होता.

दोन दिवसांच्या तुलनेत पुर्वपट्ट्यातदेखील पावसाचा जोर वाढला. दरम्यान निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा प्रतितास २० किमी वेगाने ईशान्यकडे सरकत असल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

कमी दाबाच्या पट्ट्यामुळे समुद्राला उधाण आले आहे. त्यामुळे देवगड बंदरात आलेल्या शेकडो मासेमारी नौका तेथेच थांबविण्यात आल्या आहेत. हवामान विभागाने सोमवारसाठी जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ जाहीर केला आहे. जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. या पावसाचा परिपक्व भातपिकावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT