Paddy Harvesting Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Update : सिंधुदुर्गात विजांच्या कडकडाटांसह पाऊस

Crop Damage Due To Rain : कुडाळ आणि सावंतवाडी तालुक्यांना पावसाने अक्षरशः झोडपून काढले. या पावसामुळे जिल्ह्यात कापणी केलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

Team Agrowon

Sindhudurg News : जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मंगळवारी (ता. ८) रात्रीपासून पाऊस सुरू आहे. कुडाळ आणि सावंतवाडी तालुक्यांना पावसाने अक्षरशः झोडपून काढले. या पावसामुळे जिल्ह्यात कापणी केलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान जिल्ह्याच्या सर्व भागात पाऊस सुरू आहे. या पावसामुळे भातपीक कापणीला ब्रेक लागला आहे.

जिल्ह्यात मंगळवारी रात्रीपासून विजांचा कडकडाट आणि मध्यरात्रीनंतर पावसाला सुरुवात झाली. जिल्ह्याच्या सर्वच भागांत पावसाच्या सरीवर सरी पडत आहेत. सावंतवाडी, कुडाळ आणि कणकवली तालुक्यात जोरदार पाऊस झाला.

बुधवारी (ता. ८)सकाळपासून पाऊस सुरूच होता. जिल्ह्यात सर्वत्र पावसाच्या सरी पडल्या. या पावसामुळे भातपीक उत्पादक शेतकऱ्यांनी कापणी करून वाळत ठेवलेल्या भातपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान पावसामुळे भातपीक कापणीला ब्रेक लागला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत ५० टक्के भातपिकाची कापणी पूर्ण झाली आहे. अद्याप ५० टक्के कापणी शिल्लक आहे. त्यामुळे सध्या पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. हवामान विभागाने ११ नोव्हेंबरपर्यंत पावसाचा अंदाज दिला आहे. या पावसामुळे परिपक्व झालेल्या भातपिकांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे.

बुधवारी पहाटेपासून सुरू झालेली पावसाची रिपरिप दुपारपर्यंत सुरूच होती. काही भागांत जोरदार सरीदेखील पडल्या. बुधवारी सकाळी आठपर्यंत सावंतवाडी तालुक्यात ४६, कुडाळमध्ये ४२, कणकवलीत २८ तर दोडामार्गात २२ मिमी पावसाची नोंद झाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maratha Youth Scheme: कर्जाचा व्याज परतावा तातडीने द्या : तांबे

Farmer Cup 2026: फार्मर कप स्पर्धेत पुतळीच्या महिला समूहाचा सहभाग

HTBT Cotton Seeds: नागपुरात संशयास्पद एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Satara Rain News: पूर्वमोसमी पावसाचा साताऱ्याला मोठा फटका

Hingoli Water Scarcity: पाणीटंचाई निवारणार्थ २८ गावांमध्ये ३६ नवीन विंधन विहिरीना मंजुरी

SCROLL FOR NEXT