Konkan Rain Update Agrowon
ॲग्रो विशेष

Konkan Rain : कोकण, विदर्भ वगळता उर्वरित राज्यात उघडीप

Vidarbha Rain : गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यात बहुतांश भागांत पावसाने विश्रांती घेतली आहे.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News : गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यात बहुतांश भागांत पावसाने विश्रांती घेतली आहे. गुरुवारी (ता.८) सकाळी कोकणातील वेंगुर्ला येथे ९९ मिलिमीटर पाऊस पडला. यामुळे धरणांत अजूनही येवा सुरू असून काही धरणांतून विसर्ग कमी करण्यात आला आहे. त्यामुळे नद्यांतील पाणीपातळी काहीशी कमी झाली आहे.

विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. वर्धा जिल्ह्यात हलका पाऊस झाला. नागपूरमधील मौदा, खाट, कोडामेंडी मंडलात ४४ मिलिमीटर पाऊस पडला. भंडारा जिल्ह्यातील केरडी, पालोरा मंडलात ३५, तर असगाव ३४ मिलिमीटर, तर चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला.

गोंदियातील कामठा, सालकेसा मंडलात ५८, मुंडिकोटा ५५, गंगाझारी ४४, रत्नारा, दासगाव, रावणवाडी ४१, गोंदिया, खामरी, तर काट्टीपूर येथे ४० मिलिमीटर पाऊस झाला. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक राहिला.

सिंधुदुर्गमधील वालावल मंडलात ९४ मिलिमीटर, तर वेतोरे ८६, शिरोडा ८०, म्हापण ७२, कणकवली, फोंडा, सांगवे, नांदगाव, वागदे ७१, पिंगुळी ६४, पेंडूर ६३, आजगाव ६१, कुडाळ येथे ६० मिलिमीटर पाऊस झाला. रायगडमधील बिरवडी मंडलात ५३ मिलिमीटर, रत्नागिरीतील आंगवली ७६, सौंदळ ६३, कळकवणे ५१, कोंडगाव ५३, पाचल ५० येथे मिलिमीटर पाऊस झाला.

मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांत काही ठिकाणी हलका पाऊस झाला. कोल्हापुरातील गगनबावडा मंडलात ६६ तर आंबा येथे ५९ मिलिमीटर पाऊस पडला.

मराठवाड्यातील बीडमधील केज, हनुमंत पिंप्री, होळ, बनसारोळा, नांदुरघाट मंडलांत हलका पाऊस झाला. नांदेडमधील येवती, लोहा, सोनखेड, जाहूर मंडलात ४०, कंधार ३४, नारंगळ ३६, पेठवडज, बारूळ, चांडोळा येथे २८ मिलिमीटर तर परभणीतील पालम, चाटोरी, पेठशिवणी, रावराजूर मंडलात हलका पाऊस झाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT