Kolhapur Rain agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस ओसरला, एका दिवसात २३ बंधारे मोकळे, अनेक मार्गावरील वाहतूक सुरळीत

Kolhapur Type Bandhara : मागच्या २४ तासांत तब्बल २३ बंधारे मोकळे झाले आहेत. सध्या जिल्ह्यातील २८ बंधारे पाण्याखाली आहेत.

sandeep Shirguppe

Rain In Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या दोन दिवसांत पावसाने उघडीप दिल्याने नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची घट होताना पहायला मिळत आहे. अचानक थांबलेल्या पावसाने संभाव्य पुराचा धोका टळला आहे. याचबरोबर घाट माथ्यावर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता परंतु घाट क्षेत्रातही पावसाचा जोर फारसा नव्हता. जिल्ह्याच्या बहुतांशी भागात तुरळक सरींचा अपवाद वगळता पाऊस पडला नाही. त्यामुळे नदीची पाणी पातळी घटली आहे.

मागच्या २४ तासांत तब्बल २३ बंधारे मोकळे झाले आहेत. सध्या जिल्ह्यातील २८ बंधारे पाण्याखाली आहेत तर पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्यावर राजाराम २६.६ फूट इतकी पाणी पातळी आहे. राधानगरी धरणात ३.९७ टीएमसी पाणीसाठा आहे. तर काळम्मावाडी धरणात ८.८५ ठक्के इतका पाणीसाठा आहे. राधानगरी धरणातून १ हजार ३०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व रुकडी, वारणा नदीवरील चिंचोली, भोगावती नदीवरील हळदी, राशिवडे व सरकारी कोगे, कासारी नदीवरील यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे व वालोली, वेदगंगा नदीवरील निळपण, वाघापूर, कुरणी, बस्तवडे व चिखली, हिरण्यकेशी नदीवरील साळगांव, ताम्रपर्णी नदीवरील कुर्तनवाडी, चंदगड, हल्लारवाडी व कोवाड, दुधगंगा नदीवरील- दत्तवाड व तुळशी नदीवरील बीड असे २८ बंधारे पाण्याखाली आहेत.

आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा टीएमसीमध्ये - तुळशी १.७७, वारणा १७.३२, दूधगंगा ८.८५, कासारी १.२६, कडवी १.७२, कुंभी १.१४, पाटगाव २.२८, चिकोत्रा ०.५२, चित्री १.११, जंगमहट्टी १.००, घटप्रभा १.५६, जांबरे ०.८२, आंबेआहोळ १.०१, सर्फनाला ०.२८ व कोदे लघु प्रकल्प ०२१ टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे (फूट). राजाराम २६.६, सुर्वे २४.५, रुई ५५.३, इचलकरंजी ५२.६, तेरवाड ४७.३, शिरोळ ३७, नृसिंहवाडी ३४, राजापूर २३.९ तर नजीकच्या सांगली ९ फूट व अंकली १०.९ फूट अशी आहे.

झापाचीवाडी प्रकल्प भरला

गतवर्षी पहिल्यांदाच पाणी साठवण केलेल्या झापाचीवाडी (ता. राधानगरी) येथील लघुपाटबंधारे प्रकल्प ८० टक्के भरला आहे. प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात चार दिवस झालेल्या पावसाने पाणी पातळीत वाढ झाली आहे. या प्रकल्पाच्या पूर्णत्वामुळे पाणीटंचाईच्या तीव्र झळा सोसणाऱ्या म्हासुर्ली परिसरातील पाण्याचा प्रश्न निकालात निघाला आहे. ९९० सहस्त्र घनमीटर पाणी साठवण क्षमतेचा हा प्रकल्प असून १०५ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. गतवर्षी या प्रकल्पाच्या मुख्य भिंतीच्या दगडी अस्तरीकरणाचे काम पूर्ण झाल्याने पहिल्यांदाच पाणी साठवण केले होते.

भूस्खलन धोक्यामुळे स्थलांतराची नोटीस

घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा वेधशाळेने दिला होता. त्यामुळे या भागातील भूस्खलनाचा धोका असणाऱ्या गावातील नागरिकांना प्रशासनाने स्थालांतर करण्याची नोटीस दिली. राधानगरी आणि गगनबावडा या तालुक्यांतील लोकांना नोटीस दिली होती. बोरावले आणि ऐनी पैकी धरमलेवाडी या गावांना स्थलांतर करण्यास सांगण्यात आले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Chhattisgarh Urea Supply: छत्तीसगडमध्ये शेतकऱ्यांना दिलासा; केंद्राने ६० हजार मेट्रिक टन यूरिया मंजूर केला

GST Reforms India : दुग्धजन्य पदार्थांवरील GST कमी केल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा, जाणून घ्या कसा फायदा होणार?

Semiconductor Chip : आली पहिली 'मेड इन इंडिया' चिप! शेतकऱ्यांना कसा होईल फायदा?

Marathwada Flood: मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान; पंचनाम्यांना विलंब

Genome Paddy Variety : भारताने विकसित केलेल्या जगातील पहिल्या जिनोम संपादित भात वाणाची काय आहे खासियत?

SCROLL FOR NEXT