Sharad Pawar : दुष्काळी भागातील अडचणीत आलेल्या कारखान्यांकडे सरकारचे दुर्लक्ष

Sugar Factory : राज्य सरकारने अडचणीत असलेल्या तेरा कारखान्यांना मदत केली. अडचणीत असलेल्या कारखान्यांना मदत करावी याबाबत आपली तक्रार नाही.
Sharad Pawar
Sharad PawarAgrowon

Sangli News : राज्य सरकारने अडचणीत असलेल्या तेरा कारखान्यांना मदत केली. अडचणीत असलेल्या कारखान्यांना मदत करावी याबाबत आपली तक्रार नाही. दुष्काळी भागातील अनेक कारखाने अडचणीत असताना राज्य सरकारचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. मात्र या सरकारने बलवानांना मदत करत त्यांच्यावर पैशाची खैरात केली आहे, अशी टीका माजी केंद्रीय कृषिमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी केली.

आगामी काळात आपल्या विचाराचे सरकार आल्यानंतर दुष्काळी भागातील अडचणीत असलेल्या कारखान्यांचा निर्णय घेऊ व त्यामध्ये महांकाली साखर कारखान्याचा पहिला नंबर असेल, असा विश्‍वास त्यांनी दिला. येथील महांकाली कारखान्याच्या मैदानावर सोमवारी (ता. ८) युवा नेते रोहित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. आमदार सुमन पाटील, मानसिंगराव नाईक, अरुण लाड, महांकाली कारखान्याच्या अध्यक्षा अनिता सगरे, सुरेश पाटील, विराज नाईक, बाळासाहेब पाटील, शंतनू सगरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Sharad Pawar
Sharad Pawar : ...तर आपल्या जमिनी क्षारपड होतील; शरद पवार यांचा सरकारला टोला

पवार म्हणाले, की आमच्या जिवाभावाचा आर. आर. पाटील सहकारी होता. स्वच्छ भूमिका आणि प्रामाणिकपणे त्यांनी जबाबदारी पार पाडली. आर. आर. पाटील यांनी केलेली कामे आजही लक्षात आहेत. आज ते आमच्यात नाहीत. आबांची कमतरता भरून काढण्याचे काम आमदार सुमन पाटील व रोहित पाटील करत आहेत. यापुढील काळात महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीत परिवर्तन करण्याचा निर्धार जनतेने केला आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी रोहितला साथ द्या, असे आवाहन त्यांनी केले.

Sharad Pawar
Sharad Pawar : जगभरातून द्राक्षाच्या नव्या जाती आणण्याकडे लक्ष द्यावे

ते म्हणाले, की आगामी काळात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत सत्ता परिवर्तन होऊन लोकांच्या विचारांचे सरकार आता येणार आहे व हे सरकार आल्यानंतर पहिला निर्णय अडचणीत असलेल्या साखर कारखान्यांच्या बाबतीत घेण्यासाठी प्रयत्न केले जातील. या निर्णयामध्ये महांकाली कारखान्याचा पहिला नंबर असेल. त्यामुळे दूध उत्पादक, ऊस उत्पादक आणि कष्टकरी शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांची सोडवणूक केली जाईल.

युवा नेते रोहित पाटील म्हणाले, की स्व.आर. आर. आबांची अपूर्ण असलेली स्वप्ने पूर्ण करण्याच्या दिशेने आम्हा सर्वांची वाटचाल चालू आहे. आबांनी या मतदार संघाला शब्द दिला होता की मतदार संघाचा कॅलिफोर्निया केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. त्यामुळे ‘अंबाबाईची पांढरी’ असलेल्या या शहरात शब्द पूर्ण करावा लागतो. शब्द अपुरा ठेवून चालत नाही. आर. आर. आबांना शब्द पूर्ण करण्याची संधी मिळाली नाही पण त्यांचा शब्द पूर्ण केल्याशिवाय मीसुद्धा स्वस्थ बसणार नाही, असे ते म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com