Monsoon Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Akola Rain Update : पावसाचा जोर ओसरला, आठवडाभरानंतर सूर्यदर्शन

Rain News : गेले आठवडाभर सलग पावसाने कंटाळलेल्यांना मागील २४ तासांत काहीसा दिलासा मिळाला आहे. मंगळवारी (ता.३०) अनेक भागांत सूर्यदर्शन झाले.

Team Agrowon

Akola News : गेले आठवडाभर सलग पावसाने कंटाळलेल्यांना मागील २४ तासांत काहीसा दिलासा मिळाला आहे. मंगळवारी (ता.३०) अनेक भागांत सूर्यदर्शन झाले. यामुळे पिकांना फायदा होईल. मात्र, पुन्हा पाऊस सक्रीय होणार असल्याचा हवामान खात्याने इशाराही दिलेला आहे.

सुरुवातीला पावसाची गरज असल्याने दिलासा मिळाला. नंतर सलग पावसामुळे पिकांचे नुकसान होण्याची स्थिती उदभवू शकते, असेही शेतकरी बोलत होते. त्यातच आता थोडा पाऊस कमी झाल्याने शेतकऱ्यांनी शेतीतील कामे सुरू केली.

मंगळवार सकाळपर्यंतच्या नोंदीनुसार अकोला जिल्ह्यात ६.८ मिलिमीटर पाऊस झाला. त्यातही अकोट (२१.४ मिलिमीटर), तेल्हारा (१३.८ मिलिमीटर) तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता. बुलडाणा जिल्ह्यातही मागील २४ तासांत पावसाचा बराच जोर कमी झाला.

काही तालुक्यांमध्ये झडीसारखा पाऊस झाला. जिल्ह्यात प्रामुख्याने शेगाव (११.३), मलकापूर (१६.९), नांदुरा (१२.२) चांगला पाऊस झाला. वाशीम जिल्ह्यात पाऊस पूर्णतः ओसरलेला दिसून आला. केवळ मालेगाव तालुक्यात २.३ मिलिमीटर पाऊस पडला.

प्रकल्प वधारले

अकोला पाटबंधारे विभागाअंतर्गत असलेले जिल्ह्यातील महत्त्वाचे प्रकल्प जुलै महिन्यात वधारले आहेत. प्रामुख्याने काटेपूर्णा या मोठ्या प्रकल्पात ४२.३१ दलघमी म्हणजेच ४८.९९ टक्के जलसाठा तयार झाला. तर वाण प्रकल्पातही मागील २४ तासांत पाण्याची आवक वाढली. या प्रकल्पात २७.९३ दलघमी म्हणजेच ३४ टक्के साठा झाला.

मध्यम प्रकल्पांपैकी एक असलेल्या मोर्णा प्रकल्पात ५९.६, निर्गुणा ५६.८१, उमा प्रकल्प २२.५८ टक्के, दगडपारवा ६१.४ टक्के पाणीसाठा झालेला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्प अद्यापही शून्य टक्केच आहे. ळगंगामध्ये २०.९३ दलघमी (३०.१९ टक्के), पेनटाकळी ८.४९ दलघमी (ता.१४.१५ टक्के) साठा बनला आहे.

ढगाळ वातावरणामुळे कीड वाढली

पावसाचा जोर काहीसा कमी झाल्यानंतर अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी सोयाबीन, कपाशी पिकांमध्ये फवारणीचे काम सुरू केले आहे. सततच्या ढगाळ वातावरणामुळे या दोन्ही पिकांवर कीड वाढलेली आहे. त्यामुळे कीड नियंत्रणासाठी शेतकरी कीडनाशकांची फवारणी करीत आहेत. काही शेतकऱ्यांनी पिकांना खतमात्रा देण्याचेही काम हातात घेतले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT