Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Pune Rainfall Update: पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाची उघडीप

Crop Damage: पुणे जिल्ह्यात मागील काही दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे काही भागात पाणी घरात घुसले असून शेतीचं मोठं नुकसान झाले आहे. गुरुवारपासून मात्र पावसात विश्रांती असून काही ठिकाणी हलक्या सरी बरसल्या.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News: गेल्या चार दिवस जिल्ह्यात दमदार पाऊस पडल्यानंतर पावसाचा जोर बुधवारपासून काहीसा ओसरला आहे. जिल्ह्यात गुरुवारी (ता. २९) अनेक ठिकाणी तुरळक सरी बरसत आहे. तर बहुतांश ठिकाणी पावसाने उघडीप दिली असून ढगाळ वातावरणाची स्थिती कायम आहे. परंतु मागील काही दिवस झालेल्या पावसामुळे नुकसानीत वाढ होत असून अनेक ठिकाणी अद्यापही पंचनामे सुरू झालेले नाही.

सकाळपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने दुपारी शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरात जोरदार हजेरीलावली. १५ ते २० मिनिटे झालेल्या जोरदार पावसाच्या सरींनी पुणेकरांची धांदल उडवली. मॉन्सून पुण्यात दाखल झाला आणि अचानक धो-धो पडणारा पावसाचा जोर कमी होऊ लागला. बुधवारी (ता. २८) सकाळपासून आकाश निरभ्र होते. सूर्यानेही दर्शन दिले, पावसाने उघडीप दिली, असे वाटत होते.

मात्र दुपारी पुन्हा आकाशात काळे ढग भरून आले आणि दोन ते तीन वाजेदरम्यान वडगांवशेरी, हडपसर, मगरपट्टा, शिवाजीनगर, एनडीए, पाषाण, कोथरूड आणि कात्रज परिसरात पावसाची जोरदार सर आली. वडगावशेरी येथे २६ मिलिमीटर पाऊस पडला. तर नारायणगाव येथे २१ मिलिमीटर, हडपसर २०, निमगिरी १६, कोरेगाव पार्क १५, मगरपट्टा १५, लवसा १४, माळीण १३ मिलिमीटर पाऊस पडला. तर दौंड, भोर, राजगुरुनगर, कुरवंडे, चिंचवड, बारामती, गिरीवन, हवेली, दापोडी, डुडुळगाव, एनडीए आणि पुरंदर येथे पावसाच्या हलक्या सरी बरसल्या.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दौंड, बारामती, इंदापूर तालुक्यांत अनेक घरांमध्ये पाणी गेल्याने संसार उघड्यावर आले. तर शेती पाण्याखाली गेल्याने पिकांचे अपरिमित नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अक्षरशः अश्रू वाहू लागले आहेत. पुरंदरच्या ग्रामीण भागात पावसाने दमदार कोसळला आहे, त्यामुळे खरिपातील पेरण्या वेळेत सुरू होतील.

मे महिन्यातच पावसाची दमदार सुरुवात झाली असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. तर शेतीच्या मशागतीच्या कामांना लवकरच वेग येईल मशागतीसाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी शेतकरी सासवड येथील बाजारपेठेत येत आहेत. तर पुरंदर तालुक्यातील धरण, कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांच्या पाणी साठ्यांमध्ये चांगली वाढ झाली.

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये मॉन्सून पूर्व वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने गेले काही दिवस थैमान घातल्याने पश्‍चिमेकडील तालुक्यात भातखाचरांना तलावांचे स्वरूप आले आहे. भातखाचरांचे बांध फुटून जनावरांच्या चाऱ्यासह हिरडा पिकाचे देखील मोठे नुकसान झाले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Land Fragmentation Act: तुकडेबंदी कायदा रद्द : महसूलमंत्री बावनकुळे

Agricultural Tools Scam: घोटाळेबहाद्दरांचे कारनामे

Forest Land Leasing: वनक्षेत्राजवळील जमीन भाडेपट्ट्याने

Vidarbha Heavy Rain : विदर्भात २५८ मंडलांत अतिवृष्टी; उर्वरित राज्यात जोर कमी

Sewage Treatment Project: सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात हलगर्जी

SCROLL FOR NEXT