
Akola News : मे महिन्यात उन्हाच्या तीव्रतेने हैराण झालेले अकोलेकर मंगळवारी (ता. २७) सायंकाळी अचानक आलेल्या वादळी पावसाने धास्तावले. शहरासह ग्रामीण भागात ढगांच्या गडगडाटात आलेल्या या पावसाने जनजीवन विस्कळीत केले.
विजांच्या कडकडाटासह आलेल्या या मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले, तर वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला होता. सतत पावसाचे वातावरण राहत असल्याने काढणीला आलेल्या उन्हाळी पिकांचे अतोनात नुकसान होत आहे.
तीळ, भुईमूग, मूग या पिकांचे नुकसान दररोजच्या या पावसाने वाढत चालले आहे. त्यामुळे हा उत्पादक चिंतातुर बनला. सायंकाळी अचानक आकाशात काळोख दाटला आणि काही क्षणांतच मुसळधार पावसाला सुरुवात झाली.
शहरातील तोष्णीवाल लेआऊट, जवाहरनगर, नेहरू चौक, अशोक वाटिका परिसर तसेच उड्डाणपुलावरून पावसाचे थेट धबधबे कोसळले. अनेक भागांत गटारे तुंबल्याने साचलेल्या पाण्यामुळे वाहनचालकांची अक्षरशः कसरत झाली.
फळबागा व पिकांचे झालेल्या नुकसानीचा प्रशासनामार्फत तातडीने अंदाज घेतला जात आहे. दरम्यान, हवामान खात्याने पुन्हा एकदा यलो अलर्ट जारी करीत जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. प्रशासनाने नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.