Monsoon Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Sangli Rain : सांगली जिल्ह्यात पावसाची उघडीप

Monsoon Rain Update : शिराळा तालुक्यासह चांदोली परिसरात गेली चार दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे.

Team Agrowon

Sangli News : जिल्ह्यात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. गेल्या चोवीस तासांत १.५ मिलिमीटर इतका पाऊस झाला असून शिराळा तालुक्यात १०.४ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. पावसाचा जोर कमी झाल्याने कृष्णा आणि वारणा नदीच्या पाण्याची पातळी स्थिर आहे. वारणा धरणातून ४५०० क्युसेकने विसर्ग सुरू आहे.

जिल्ह्यात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. शिराळा तालुक्यातही पावसाचा जोर कमी झाला आहे. शिराळा तालुक्यासह चांदोली परिसरात गेली चार दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला आहे.

वारणा धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात १२ मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. वारणा धरण पाणलोट क्षेत्रात आजअखेर १५९७ मिलिमीटर पाऊस झाला. पावसाने उघडीप दिली असली तरी वारणा धरणाच्या सांडव्यातून २८७०, तर विद्युत निर्मितीमधून १६३० असा एकूण ४५०० क्युसेक विसर्ग वारणा नदीत सुरू असल्याने गेली पाच दिवस वारणा नदीची पाणी पातळी स्थिर आहे.

पोट मळीत पाणी साठून राहिल्याने जनावरांसाठी लागणारा चारा कुजण्याची भीती निर्माण झाली आहे. जिल्ह्याच्या इतर तालुक्यात पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांच्या रखडलेल्या पेरण्यांना गती आली आहे.

तसेच ऊस लागवडी सुरु झाली आहे. मंगळवार (ता. १ जुलै) ते सोमवार (ता. १४) जुलै अखेर ४३.३ मिलिमीटर म्हणजे ३२ टक्के इतका पाऊस झाला आहे. शिराळा तालुक्यात १२ दिवस पाऊस झाला आहे.

गेल्या चोवीस तासांत तालुकानिहाय झालेला पाऊस (मिलीमीटरमध्ये)

मिरज - १.६, जत -०.१, खानापूर-विटा-०.४, वाळवा-इस्लामपूर-१.०, तासगाव, ०.६, शिराळा-१०.४, आटपाडी-०.३, कवठेमहांकाळ ०.१, पलूस-०.६, कडेगाव-१.०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Illegal Sand Mining: बाणगंगे नदीतून अवैध वाळू उपसा

Agricultural College Camp: दर्जी बोरगावमध्ये कृषी महाविद्यालयाचे शिबीर

Wildlife Conflict: शेतांत हत्तींचा कळप ठाण मांडून

Ujani Dam Hunger Strike: उजनी धरण कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण

Silk Village Project: लातूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एक रेशीमयुक्त गाव निर्माण करणार

SCROLL FOR NEXT