Paddy Harvesting  Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Harvesting : भातपीक कापणीत पावसाचा अडथळा

Rain Update : विजांच्या कडकडाटासह झालेल्या या पावसामुळे गतीने सुरू असलेल्या भातपीक कापणीत अडथळा निर्माण झाला आहे.

एकनाथ पवार

Sindhudurg News : जिल्ह्यातील दोडामार्ग, बांदा परिसरातील अनेक गावांना सोमवारी (३० ऑक्टोबर) सायंकाळी उशिरा जोरदार पावसाने झोडपले. विजांच्या कडकडाटासह झालेल्या या पावसामुळे गतीने सुरू असलेल्या भातपीक कापणीत अडथळा निर्माण झाला आहे. काही ठिकाणी कापणी केलेल्या भातपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी सुरू झालेली थंडीदेखील गायब झाली आहे.

जिल्ह्यात २१ ऑक्टोबरला जोरदार पाऊस झाला होता. त्यानंतर पावसाने पूर्णतः उघडीप दिली. गेले आठ नऊ दिवस जिल्ह्यात कुठेही पाऊस पडला नव्हता. त्यामुळे जिल्ह्यातील भात उत्पादकांनी भातपीक कापणीला गती दिली होती.

आठ ते नऊ दिवसांत १५ हजारांहून अधिक हेक्टरवरील भातपीक कापणी पूर्ण केली होती. दोन दिवसांपासून जिल्ह्यात थंडीची चाहुल देखील लागली होती. परंतु सोमवारी सकाळपासून वातावरणात अचानक बदल झाला. थंडीदेखील गायब झाली. सकाळपासून तापमानात वाढ झाल्याचे चित्र होते.

दरम्यान, दुपारी तीन-चार वाजेपासून ढगाळ वातावरण तयार झाले. त्यामुळे भातपीक कापणी केलेल्या शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. मोठ्या प्रमाणात कापणी केलेली असल्यामुळे पिकाची आवराआवर करताना शेतकऱ्यांची दमछाक झाली. मात्र सायंकाळी पाच वाजता दोडामार्ग, बांदा (ता. सावंतवाडी) परिसरातील काही गावांमध्ये विजांच्या कडकडाटांसह जोरदार पावसाला सुरुवात झाली.

त्यानंतर कणकवली तालुक्यातील फोंडा परिसरातील अनेक गावांमध्ये जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे कापणी करून ठेवलेले भातपीक भिजले आहे. काही ठिकाणी पावसामुळे भातपिकांचे नुकसानदेखील झाले आहे.

दोडामार्ग तालुक्यात जोरदार पावसाचा फटका भातपिकाला बसला आहे. या पावसामुळे गतीने सुरू असलेल्या भातपीक कापणीत अडथळा निर्माण झाले आहे. आजही पाऊस पडेल या शक्यतेने शेतकऱ्यांनी पिकांची कापणी थांबविली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT