Kharif Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Crop In Crisis : असमतोल पावसाचे संकट

Kharif Season : बऱ्याच भागात गेल्या दहा ते १२ दिवसांपासून पावसाने दडी मारली असून शेतकरी पीक वाचवण्यासाठी धडपड करू लागले आहेत.

Team Agrowon

Akola News : पश्चिम विदर्भात या वर्षी असमतोल स्वरूपाचा पाऊस पडल्याचा फटका शेतकऱ्यांना बसू लागला आहे. बऱ्याच भागात गेल्या दहा ते १२ दिवसांपासून पावसाने दडी मारली असून शेतकरी पीक वाचवण्यासाठी धडपड करू लागले आहेत.

सिंचनाची सुविधा असलेल्यांनी तुषार सिंचन सुरू केले आहे. तर अशी सुविधा नसलेले शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत. दुसरीकडे काही भागात समाधानकारक पावसाने पिकांची अवस्था चांगली असल्याचेही सुखद चित्र असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

या वर्षी पावसाने शेतकऱ्यांना मोठ्या संकटात टाकले आहे. बहुतांश शेतकऱ्यांना जुलैत पेरणी करावी लागली आहे. या भागात प्रामुख्याने सोयाबीन हेच मुख्य पीक आहे. सोयाबीन पेरणीनंतर पाऊस नसेल तर अंकुरण कमी होते.

मध्यंतरी बऱ्याच शेतकऱ्यांचे सोयाबीन उगवले नसल्याच्या तक्रारी कृषी खात्याकडे केल्या आहेत. यंदा हुमणी अळीचा प्रकोपही सर्वत्र वाढला आहे. ही अळी रातोरात पिके फस्त करीत असल्याने काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले.

अकोला, वाशीम, बुलडाणा या तीनही जिल्ह्यांत खरीप लागवड अंतिम टप्प्यात आलेली आहे. सुरुवातीला लागवड झालेल्या पिकांची अवस्थाही चांगली आहे. मध्यंतरी दुबार पेरणी क्षेत्र मात्र कमी पावसाच्या तडाख्यात सापडले आहे. यंदा काहींना २५ व २६ जूनला झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसानेही दुबार पेरणी करावी लागलेली आहे. आता हे सर्वच क्षेत्र कमी पावसाने अडचणीत आलेले आहे.

आमच्या भागात १५ जुलैपासून पेरणीला सुरुवात झाली होती. पण चांगला पाऊस नसल्यामुळे सोयाबीनला अंकुरण झाले नाही. एक तर पेरणी उशिरा झाली त्यात पाऊस नव्हता. या वर्षी आमच्या भागात विचित्र स्थिती बनली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना दुबार पेरणी सुद्धा करावी लागली. निसर्गाच्या लहरीपणामुळे मला ११ एकर मोडून परत पेरणी करावी लागली.
- विनोद पाटील, शेतकरी, सुदी, जि. वाशीम

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Update Maharashtra : पावसाचे ताजे अपडेट, विदर्भ मराठवाड्यासह कोकणात अतिवृष्टी; खानदेशात शेतीपिकांना दिलासा

Farmer Crisis: पीकं हातची जाऊनही विम्याचा आधार नाही; पीकविम्यातील बदलाचा शेतकऱ्यांना फटका

CM Fadanvis at Dahihandi: पापाची हंडी फोडली, आता विकासाची हंडी लावणार: मुख्यमंत्री फडणवीस

Bihar Economic Package: बिहारमध्ये १ कोटी तरुणांसाठी रोजगार संधी; नितीश कुमारांनी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर केले

PM Surya Ghar Yojana: प्रधानमंत्री सूर्यघर वीज योजनेने महाराष्ट्रात गाठला नवा टप्पा; लातूर परिमंडळ आघाडीवर

SCROLL FOR NEXT