Paddy  Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Crop Damage : रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने भात पिकाचे नुकसान

Heavy Rain : सलग दोन दिवस जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. बुधवारी (ता. २५) दिवसभर पाऊस कोसळत होता. त्यामुळे कमी दिवसांच्या भात बियाण्याच्या शेतीचे मोठे नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Team Agrowon

Ratnagiri News : सलग दोन दिवस जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. बुधवारी (ता. २५) दिवसभर पाऊस कोसळत होता. त्यामुळे कमी दिवसांच्या भात बियाण्याच्या शेतीचे मोठे नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. रत्नागिरी तालुक्यात कापलेले भात पावसामुळे भिजले. ते कुजून जाऊ नये म्हणून भिजलेल्या अवस्थेत झोडावे लागले.

मंगळवारी सायंकाळी सुरू झालेल्या पावसाचा जोर बुधवारी दिवसभर सुरूच होता. मंगळवारी सकाळच्या सत्रात रत्नागिरी तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी तयार झालेले भात कापून शेतामध्येच सुखत ठेवले होते. सायंकाळी आलेल्या पावसाने कापून ठेवलेले भात भिजून गेले. लोंब्या कुजून जाऊ नयेत यासाठी शेतकऱ्यांनी घरामध्ये भात मोकळ्या जागेत ठेवून दिले होते.

ते भात अखेर आज सकाळी झोडून घेण्यात आले. रत्नागिरी तालुक्यातील सोमेश्वर, पोमेंडीसह आजूबाजूच्या परिसरात पाहायला मिळाली. बुधवारी दिवसभर पावसाचा जोर राहिल्यामुळे झोडलेले भात सुकवण्यासाठी जसेच्या तसे ठेवावे लागले. ते भात व्यवस्थित सुकले नाही, तर ते काळे पडण्याची भीती आहे.

तसेच मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी उभे भात आडवे होण्याची शक्यता आहे. हळव्या बियाण्यांची जिल्ह्यात सुमारे १० हजार हेक्टरवर लागवड झाली आहे. त्यातील पाच टक्के भात सध्या अडचणी असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पावसाचा जोर असाच राहिला तर त्यात वाढ होण्याची भीती आहे.

बुधवारी रत्नागिरी, चिपळूण, लांजा, संगमेश्वर तालुक्यात सकाळपासून जोरदार पाऊस झाला. दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाला मात्र पावसाची रिपरिप सांयकाळी उशिरापर्यंत सुरू होती. चिपळूणातील जनजीवन विस्कळित झाले. पोफळी परिसरात ढग फुटी सदृश पावसाने येथील ग्रामस्थांची दणादण उडाली आहे.

सावर्डे परिसरातही जोरदार पाऊस झाला. दसपटी, पंधरागावसह खाडीपट्यात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. शिवनदीसह वाशिष्ठी नदीतील पाण्याची पातळी वाढली होती. शहरातून जाणाऱ्या महामार्गावर काही ठिकाणी पाणी साचले होते. मात्र पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पाण्याचा निचरा झाला. मुसळधार पावसाने तालुक्यात कुठेही मोठे नुकसान झाले नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Payments Pending: ऊस बिले द्या, अन्यथा जलसमाधि

Farmer Loan Waiver : २०१७ आणि २०१९ च्या कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी निर्णय

Drinking Water Storage: तेरा प्रकल्पांतील साठा पिण्यासाठी आरक्षित

Tur Seeds Procurement: तेलंगणातील शेतकरी तूरीच्या बियाणे खरेदीसाठी करमाळ्यात

Agrowon Podcast: आल्याचा भाव टिकून; सोयाबीन टिकून, गहू आवक घटली, तर कापूस व कारले स्थिरावले

SCROLL FOR NEXT