Rain Update  Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Update : खानदेशात पाऊस सुरूच

Rain News : मागील चार ते पाच दिवसांपासून खानदेशात काही भागात रोज पाऊस येत आहे. काही भागात तुरळक पाऊस असून, पावसाने विश्रांती घेतल्याची स्थिती आहे.

Team Agrowon

Jalgaon News : मागील चार ते पाच दिवसांपासून खानदेशात काही भागात रोज पाऊस येत आहे. काही भागात तुरळक पाऊस असून, पावसाने विश्रांती घेतल्याची स्थिती आहे. खानदेशात जूनमधील सरासरीच्या तुलनेत अनेक भागांत चांगला किंवा अधिक पाऊस झाला.

जूनमध्ये अपेक्षित पावसाच्या तुलनेत चाळीसगाव, जळगाव, भडगाव, अमळनेर, पारोळा, धुळ्यातील शिरपूर या भागात अधिकचा पाऊस झाला होता. या महिन्यातही पाऊसमान बऱ्यापैकी आहे. सध्या जळगाव जिल्ह्यातील धरणगाव, अमळनेर, चोपडा, जळगाव, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील शहादा, तळोदा, नवापूर, अक्कलकुवा आदी भागात रोज पाऊस येत आहे.

पाऊस सर्वत्र एकसारखा नाही. काही भागात जोरदार तर काही भागात मध्यम पाऊस असते. नंदुरबारातील शहादा, तळोदा भागात मागील सहा दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच आहे. अतिपावसाने या भागातील पिके पाण्याखाली गेली आहे. आंतरमशागत, शेतीकामे ठप्प असून, पिकांची स्थिती बिकट बनली आहे.

परंतु जळगाव जिल्ह्यातील जामनेर, चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, बोदवड, मुक्ताईनगर, भुसावळ, रावेर आदी भागात मागील काही दिवसांपासून अपवाद वगळता पाऊस झालेला नाही. धुळ्यातील धुळे, साक्री भागातही पावसाने विश्रांती घेतल्याची स्थिती आहे. मागील आठवड्यातही धुळ्यातील धुळे, साक्री भागात मध्यम ते हलका पाऊस होता.

जेथे पाऊसमान कमी आहे. तेथे शेतीची मशागत व अन्य कामे सुरू आहेत. फवारणी, खते दिली जात आहेत. तसेच तणनियंत्रणही केले जात आहे. पीकस्थिती बरी आहे. पावसाचा ताण खानदेशात पिकांना या पावसाळ्यात आतापर्यंत पडलेला नाही, अशी स्थिती आहे. कारण उष्णता कमी झाली आहे. ऊन-सावली अशी स्थिती असते. मध्येच तुरळक पाऊसही येतो.

पावसाची टक्केवारी बरी

खानदेशात पावसाची टक्केवारी बरी आहे. जळगाव जिल्ह्यात एकूण ७६५ मिलिमीटर पाऊस पडतो. यातील ४५ टक्के पाऊस जिल्ह्यात झाला आहे. धुळ्यात ५६५ मिलिमीटर एकूण पाऊसमान आहे. यातील ३७ टक्के पाऊस धुळ्यात झाला आहे. नंदुरबारात मागील आठवड्यात एकूण सरासरीच्या तुलनेत पावसाची तूट होती. परंतु या आठवड्यातील पावसाने तूट भरून निघाली असून, एकूण सरासरीच्या तुलनेत ४१ टक्के पाऊस जिल्ह्यात झाला आहे. जिल्ह्यातील एकूण पाऊसमान सुमारे ८३२ मिलिमीटर एवढे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Crop Damage: मराठवाड्यात ३ लाख ५८ हजार हेक्टरवरील पिकांना फटका

Ahupe Village Rehabilitation: ‘आहुपे’च्या पुनर्वसनाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवा

Jal Jeevan Mission: पाणीपुरवठा कामांच्या गतीकरिता समन्वयक अधिकारी नेमा : जिल्हाधिकारी डूडी

Pune Heavy Rainfall: मुळशी धरण क्षेत्रात सर्वाधिक २१० मिमी पावसाची नोंद

Bogus Agri Input: बोगस निविष्ठा उत्पादकांविरोधात देशव्यापी अभियान

SCROLL FOR NEXT