Rain Update Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Update : कर्जत, जामखेड, श्रीगोंदा तालुक्यांत पावसाने दिलासा

Rainfall Update : अहिल्यानगर जिल्ह्यातील दुष्काळी पट्टा असलेल्या कर्जत, जामखेडसह श्रीगोंदा, नेवाशात रविवारी (ता. १०) रात्री पाऊस झाल्याने खरीप पिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

Team Agrowon

Ahilynagar News : अहिल्यानगर जिल्ह्यातील दुष्काळी पट्टा असलेल्या कर्जत, जामखेडसह श्रीगोंदा, नेवाशात रविवारी (ता. १०) रात्री पाऊस झाल्याने खरीप पिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. प्रशासनाकडील नोंदीनुसार कर्जमधील कोंभळी मंडलात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात काही ठिकाणचा अपवाद वगळला तर जवळपास सलग महिन्यापासून पावसाचा खंड पडला आहे. त्याचा गंभीर परिणाम खरिपाच्या पिकांवर झाला आहे. वाढ खुटंली आहे. खते देण्याला अडचणी येत आहेत.

दोन दिवसांपासून मात्र वातावरणात बदल झाला असून रविवारी (ता. १०) रात्री कर्जत, जामखेड, श्रीगोंदा, नेवासा तालुक्यांतील अनेक भागांत चांगला पाऊस झाला. या पावसाने खरिपाच्या पिकांना दिलासा मिळाला आहे.

तूर, कापसाला खते देण्यसारखी स्थिती झाली आहे. पाथर्डी, शेवगाव, व अन्य भागांतही पावसाचा शिडकावा झाला. अकोले तालुक्यात पावसाची उघडीपच आहे. पावसाच्या खंडामुळे धरणातील पाण्याची आवक थांबली, विसर्गही बंद आहे.

जिल्ह्यात मागील २४ तासांत नोंदलेला पाऊस (मिमी) ः

कापुरवाडी ः १६, मांडवगण ः १३, कोळगाव ः १८, कर्जत ः ५१, कोंभळी ः ७१, मिरजगाव ः ५५, माहीजळगाव ः २९, वालवड ः ५१, कोरेगाव ः ३६, अरणगाव ः ३८, कुकाणा ः १९, घोडेगाव ः १९, देडगाव ः १७.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MSP Procurement: मका, ज्वारीची १ मेपासून हमीभावाने खरेदी

Tree Plantation: १९ हेक्टरवर ५७ लाख रोपणास ३.६९ कोटी होणार खर्च

Fertilizer Supply: परभणी जिल्ह्यात खरिपासाठी एक लाख ६१ हजार टन खतांचा पुरवठा

Tribal Economy: मोहाच्या फुलांमुळे स्थानिक अर्थकारणाला बळ

Drought Management Committee: जिल्हास्तरीय ‘दुष्काळ व्यवस्थापन समिती’ची नव्याने रचना

SCROLL FOR NEXT