Farmers Issue  Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Sowing : पावसाच्या भरवशावर पेरण्या केलेल्यांचे डोळे आकाशाकडे

Kharif Season 2025 : नांदेड जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरण्या गत आठवड्यात सुरू केल्या आहेत. अ

Team Agrowon

Nanded News : नांदेड जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरण्या गत आठवड्यात सुरू केल्या आहेत. अनेक ठिकाणी पेरण्यांची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. परंतु मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली आहे. तसेच तापमानात वाढ झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

नांदेड जिल्ह्यातील सर्वच १६ तालुक्यांतील शेतकऱ्यांनी सोयाबीन, कपाशी, हळद, तूर, मूग, उडीद आदी पिकांची पेरणी पूर्णत्वाकडे नेली आहे. या पिकांचे कोवळे रोपे उगवून आले असतानाच पावसाचा खंड व तापमानवाढ यामुळे जमिनीतील ओलाव्याची पातळी कमी होऊ लागली आहे. परिणामी, उगवलेली रोपे कोमेजण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

यामुळे पावसाची वाट पाहत शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. दररोज ढगांची चाहूल लागते, पण पावसाचे थेंब मात्र अद्याप पडत नाही. विशेषतः सोयाबीन व मूग या नाजूक पिकांच्या कोवळ्या मोडांना कडक उन्हामुळे इजा पोहोचत आहे. यामुळेे भविष्यकाळात उत्पादनावर थेट परिणाम करू शकते.

या पार्श्‍वभूमीवर कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना पेरणीनंतर जमिनीत ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आंतरमशागत, हलकी कुळवणी आणि पीक संरक्षक उपाययोजना कराव्यात असे सांगण्यात आले आहे. तसेच काही तालुक्यांमध्ये निंबोळी अर्क फवारणी, सेंद्रिय खतांचा वापर, जमिनीच्या हलक्या आवरणाने झाकण अशा उपाययोजना राबविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हवामान विभागाने गुरुवारी (ता. १९) व शुक्रवारी (ता. २०) पावसाचा अंदाज वर्तवला आहे. परंतु तोपर्यंत शेतकऱ्यांनी संयम बाळगावा, तसेच कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली परिस्थितीचा सामना करावा, असा सल्ला देण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्यात पावसाचे आगमन थांबलेले असले तरी खरीप हंगामाचे भवितव्य पुढील काही दिवसांत पडणाऱ्या पावसावर अवलंबून राहणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Lumpy Skin Disease : लम्पी स्कीन आजाराचा पशुधनात वाढता धोका

Khandesh Rain : खानदेशात आठ दिवसांपासून पावसाची दडी

Agriculture Scheme : शेतीपूरक विविध योजनांचा लाभ घ्या

Cooperative Bank Award : अकोला-वाशीम जिल्हा बँकेला पुरस्कार

Electricity Connection : मराठवाड्यात वर्षभरात सव्वा लाख नवीन वीज जोडण्या

SCROLL FOR NEXT