Kharif Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Sowing : सिन्नरला खोळंबलेल्या खरिपाच्या पेरण्यांना वेग

Kharif Season : संततधारेमुळे तालुक्याच्या सिन्नर, सोनांबे, पांढुर्ली या महसूल मंडळांत पेरण्या खोळंबल्या होत्या. पूर्व भागातील महसूल मंडळांत पेरणी ८५ टक्क्यांच्या पुढे गेली आहे.

Team Agrowon

Nashik News : आठवडाभरापासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे तालुक्याच्या पश्चिम भागात खरीप पीक पेरणीला वेग आला आहे. अजून दोन ते तीन दिवस पावसाने विश्रांती घेतल्यास १०० टक्क्यांपर्यंत पेरणी होण्याचा अंदाज आहे. सद्यःस्थितीत तालुक्यात एकूण ६० टक्के पेरणी झाली आहे.

संततधारेमुळे तालुक्याच्या सिन्नर, सोनांबे, पांढुर्ली या महसूल मंडळांत पेरण्या खोळंबल्या होत्या. पूर्व भागातील महसूल मंडळांत पेरणी ८५ टक्क्यांच्या पुढे गेली आहे. तुलनेने पावसामुळे पश्चिम भागात पेरण्या होऊ शकल्या नव्हत्या. तालुक्यात खरिपाचे एकूण सर्वसाधारण क्षेत्र ६० हजार ३५ हेक्टर असून यापैकी ३६ हजार ३१ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

सोयाबीनची पेरणी अवघी ४९ टक्के

तालुक्यात मका व सोयाबीनचे सर्वाधिक क्षेत्र आहे. मका पिकाच्या १४ हजार ४४२ हेक्टर क्षेत्रापेक्षा तुलनेने १८ हजार ८५२ हेक्टरवर पेरणी झाली आहे. सर्वसाधारणपेक्षाही ३० टक्के जास्त क्षेत्रावर मका पिकाची पेरणी झालेली आहे.

त्यामुळे मका पिकाकडे शेतकऱ्यांचा कल असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर सोयाबीनचे ३१ हजार १२१ इतके सर्वसाधारण क्षेत्र असून यापैकी १५ हजार ३२९ हेक्टरवर पेरणी झाली आहे. पश्चिम भागात सोयाबीनची सर्वाधिक पेरणी होते.

बाजरीच्या क्षेत्रात मोठी घट

बाजरीचे सात हजार ५७५ हेक्टर क्षेत्र असून, यापैकी केवळ ६५१ हेक्टरवर खरीप बाजरीची पेरणी झाली आहे. तूर २३ हेक्टर, मूग ५५ हेक्टर, भुईमूग एक हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. खरीप ज्वारी, नागली, खुरासणी, सूर्यफूल, तीळ या पिकांची अद्यापही पेरणी झालेली नाही.

सातत्याने पाऊस पडत असल्याने पेरणीसाठी वाफसा मिळत नव्हता. त्यामुळे पश्चिम भागात पेरण्या खोळंबल्या होत्या. उघडीप मिळाल्याने पेरणीला वेग आला आहे.
- ज्ञानेश्वर नाठे, तालुका कृषी अधिकारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Manikrao Kokate Controversy: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या नव्या वक्तव्याने पुन्हा वाद; राजीनाम्याच्या मागणीला जोर

Khandesh Water Storage : भूगर्भातील पाणी उपसा घटला

Watermelon Farming : खरिपातील कलिंगडाची लागवड यंदा कमीच

MSP committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या हमीभाव समितीच्या नियमित बैठका; केंद्रीय कृषिमंत्र्यांचे उत्तर

Agrowon Podcast: पपईच्या दरात सुधारणा; कारली-मका तेजीत, कोथिंबीर स्थिर, तर तूर मात्र मंदीत

SCROLL FOR NEXT