Kharif Sowing : कोल्हापुरात ८३ टक्के पेरण्या

Kharif Season : गेल्या वर्षीपेक्षा १२ हजार ३८९ हेक्टरने ऊस क्षेत्र वाढले आहे. पन्हाळा, शाहुवाडी, गगनबावडा, करवीर तालुक्यात भात रोप लागणीची कामे जोमाने सुरू आहेत.
Kharif Sowing
Kharif Sowing Agrowon
Published on
Updated on

Kolhapur News : जिल्ह्यात भात, भुईमूग, ज्वारी, सोयाबीनसह इतर कडधान्यांची १ लाख ५१ हजार १८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. अजूनही २७ हजार ९२९ हेक्टर क्षेत्रावर अद्याप पेरण्या झालेल्या नाहीत.

यंदा १ लाख ९८ हजार ६०४ हेक्टरवर उसाची लागण केली जाणार आहे. गेल्या वर्षीपेक्षा १२ हजार ३८९ हेक्टरने ऊस क्षेत्र वाढले आहे. पन्हाळा, शाहुवाडी, गगनबावडा, करवीर तालुक्यात भात रोप लागणीची कामे जोमाने सुरू आहेत. तर, उसाचे पीक सध्या तरी समाधानकारक असल्याचे दिसून येत आहे.

Kharif Sowing
Kharif Sowing : पावसाच्या दडीमुळे पेरणी अजूनही साठीतच

जिल्ह्यात जूनमध्ये सरासरी ३६२.०९ मिली मीटर पाऊस होतो. ३० जूनपर्यंत ३८७.० (१०६.० टक्के) मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. जुलै २०२५ महिन्याचे सरासरी पर्जन्यमान ६८५.५ मिली मीटर असून आत्तापर्यंत २१२.३ (३१.०० टक्के) मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे.

Kharif Sowing
Kharif Sowing : मराठवाड्यात ४५ लाख ७० हजार हेक्टरवर पेरणी

नद्यांच्या पाणी पातळीत कमी-अधिक प्रमाणात वाढ होत आहे. या आठवड्याच्या शेवटी पावसाने उघडीप दिल्याने वापसा आलेल्या ठिकाणी पेरणी केली जात आहे. काही ठिकाणी जादा पावसामुळे जमिनीतील ओलावा कमी झालेला नाही. खरीप हंगामासाठी जमिनीची पूर्वमशागती करण्यामध्ये अडचणी येत आहेत. त्या ठिकाणी पेरण्या खोळंबल्या आहेत.

एक लाख ८०,७४६ हेक्टरवर पेरणी

हलक्या जमिनीमध्ये पेरणीची कामे सुरू असून जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये पुरेशा प्रमाणात पाऊस झालेला आहे. खरीप हंगामासाठी १ लाख ८० हजार ७४६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

यामध्ये भात ९० हजार ६४० हेक्टर. खरीप ज्वारी ६७२ हेक्टर, नाचणी १६ हजार ३०७ हेक्टर, खरीप मका २० हेक्टर, इतर तृणधान्ये ३९८ हेक्टर. तूर २९० हेक्टर, मुग ४८७ हेक्टर, उडीद ७५० हेक्टर. इतर कडधान्ये ७२१ हेक्टर. भुईमूग२८ हजार ५२९ हेक्टर. कारळा २६१ हेक्टर, सोयाबीन ४१ हजार ४४५ हेक्टर. इतर गळीत२० हेक्टर, या पिकांचा समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com