Rahul Gandhi Agrowon
ॲग्रो विशेष

Rahul Gandhi : परदेशात जाऊन भारताचा अवमान करणे राहूल गांधींचा अजेंडा : भाजप

जेव्हा सुरत कोर्टाने निर्णय दिला तेव्हा राहूल गांधींचे वकील कोर्टात का गेले नाहीत. त्यांनी कोर्टात जाऊन दाद मागायला हवी होती.

Team Agrowon

पुणे : राहूल गांधी (Rahul Gandhi) यांनी माफी न मागितल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती भाजप ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद (Ravishankar Prasad) यांनी पत्रकार परिषद (ता.२५) घेऊन दिली आहे.

राहूल गांधींनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर केलेले आरोप देखील भाजपने यावेळी खोडले आहेत.

यावेळी रविशंकर प्रसाद म्हणाले की, देशाबाहेर जाऊन भारताचा अपमान करणे हा राहूल गांधींचा अजेंडा आहे. त्यामुळे राहूल गांधीविरोधात देशभर भाजप आंदोलन करणार आहे. तसंच त्यांनी भाजपवर केलेल्या आरोपांत कोणतीही तथ्य नाही, असंही ते म्हणाले.

तसंच जेव्हा सुरत कोर्टाने निर्णय दिला तेव्हा राहूल गांधींचे वकील कोर्टात का गेले नाहीत. त्यांनी कोर्टात जाऊन दाद मागायला हवी होती, असंही रविशंकर प्रसाद म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदानींच नातं काय?, अदाणीच्या शेल कंपनीत २० हजार कोटी रुपये कुणाचे? असा सवाल राहूल गांधींनी केला आहे. याबाबत मात्र भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी मौन पाळलं होतं.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fruit Processing Industry Development: फळप्रक्रिया उद्योगांसाठी लवकरच नवीन योजना : केंद्रीय कृषी सचिव आतिश चंद्रा

SCROLL FOR NEXT