Rahul Gandhi  Agrowon
ॲग्रो विशेष

Rahul Gandhi : '..आम्ही जल, जंगल आणि जमिनीचे हक्क आदिवासींना देऊ' : राहुल गांधी

Bharat Jodo Nyaya Yatra : खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मंगळवारी (ता.१२) महाराष्ट्रातील नंदुरबारमध्ये पोहचली. यावेळी राहुल गांधी यांनी जाहीर सभेत भाजपवर टीका करताना, काँग्रेसचे सरकार आल्यास आदिवासींना जल, जंगल आणि जमिनीचे हक्क देऊ, असे म्हटले आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : मणिपूर येथून १५ जानेवारीला सुरू झालेली भारत जोडो न्याय यात्रा मंगळवारी (ता.१२) महाराष्ट्रातील नंदुरबारमध्ये पोहचली. यावेळी राहुल गांधी यांनी, आयोजित  'आदिवासी न्याय परिषदे'ला संबोधित करताना भाजपवर टीका केली. तसेच काँग्रेसचे सरकार आल्यास आदिवासींचे प्रश्न मार्गी लावू. या देशातील जल, जंगल आणि जमिनीचे खरे मालक हे आदिवासी असून त्यांना त्यांचे हक्क देऊ, असे म्हटले आहे. तसेच, पीएम मोदींनी २०-२५ अब्जाधीशांचे १६ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले. मात्र आदिवासी, मजूर इत्यादींचा एक रुपयाही माफ केला नाही, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

पुढे राहुल गांधी म्हणाले, आदिवासी हे देशाचे खरे मालक आहेत. पण, मोदींनी आदिवासींचे कर्ज माफ केलं नाही. त्यांनी उद्योगपतींचे कर्ज माफ केले. मोदींनी आदिवासींवर अन्याय केला. देशात एकीकडे ७० टक्के जनता आहे. तर दुसरीडे २०-२२ लोक आहेत. मोदींनी या लोकांच्या हातात विमानतळ, इन्फ्रास्ट्रक्चरसह संपूर्ण देश दिला आहे. त्यांच्यासाठी सगळ दिलं जात आहे. याकडे उर्वरित देश बघत आहे, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे. 

आदिवासी हेच देशाचे खरे मालक आहेत. पण भाजप आदिवासींना वनवासी म्हणत आहे. मग सांगा तुम्ही आदिवासी आहात की वनवासी? आदिवासीचा अर्थ काय? असा सवाल उपस्थित लोकांना केला आहे. तर आमच्या मते भारताचे खरे मालक आदिवासी आहेत. जे जंगलात राहतात. जल, जंगल आणि जमीन आदिवासींचे आहे. तर वनवासी म्हणजे ज्यांचा जल, जंगल आणि जमिनीवर कोणताच हक्क नाही.

यामुळेच भाजप तुम्हाला वनवासी म्हणतं अशी टीका केली आहे. तर आज जंगलेच अदानीला दिली जात आहेत. यामुळे जेव्हा भविष्यात जंगलच राहणार नाही. तेव्हा काय? आदिवासी कुठलेच राहणार नाहीत. तुम्ही वनवासी आहात, वने तर राहीलेच नाहीत. देश तुमचा नाही असे भाजप म्हणेल असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे. 

तसेच देशाचे प्रशासन चालणाऱ्या ९० अधिकाऱ्यापैकी १ आदिवासी असणाऱ्या अधिकाऱ्यालाही बाजूला करण्यात आल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. तर देशातील मोठ्या कंपन्या, व्यवस्थापनासह प्रशासनात देखील आदिवासींचे स्थान दिसत नाही. यामुळे देशात काँग्रेसची सत्ता आल्यास जातीय जनगणना केली जाईल. आदिवासींना न्याय देताना, जल, जंगल आणि जमिनीचे हक्क देऊ, असे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

LPG Cylinder Supply Issue: ‘उज्ज्वला’च्या डोईवर पुन्हा सरपण

Tur Farming: तूर लागवडीसाठी निवडा योग्य वाण

Farmer Conflict Resolution: अडीच महिन्यात मिटवली ६६३ बांधांची भांडणं

Brazil Cooperative Model: ब्राझीलमधील सहकारी संस्थांची व्यावसायिकता

Farmers Protest: धनगाव येथे कर्जमाफी आदेशाची होळी

SCROLL FOR NEXT