Aslam Abdul Shanedivan
राहुल गांधी १४ जानेवारीला भारत न्याय यात्रा काढणार आहेत. ही यात्रा पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणारी असेल.
भारत न्याय यात्रेत ६,२०० किलोमीटरचे अंतर, 14 राज्ये आणि 85 जिल्ह्यांचा दौरा असणार आहे. यावेळी मल्लिकार्जुन खरगे हे इम्फाळ येथे हरज राहत यात्रेला हिरवा झेंडा दाखवतील.
भारत जोडोनंतर भारत न्याय यात्रेची तयारी करण्यात आल्याची माहिती काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल यांनी दिली. यावेळी ही यात्रा देशातील जनतेला आर्थिक, सामाजिक आणि राजकीय न्याय मिळवून देण्यासाठी असेल असेही ते म्हणाले.
मणिपूर हा या देशाचा महत्त्वाचा भाग आहे. तर मणिपूरच्या जनतेच्या जखमा या अजूही ताज्या आहेत. त्या भरून काढण्यासाठीच मणिपूरहून सुरूवात करत असल्याचे वेणुगोपाल म्हणाले.
पहिल्या टप्प्यात कन्याकुमारी ते काश्मीर असा 4,500 किलोमीटरचा टप्पा पार करण्यात आला होता. ज्यात राहल गांधी यांनी 12 राज्यांचा प्रवास केला होता. यावेळी 14 राज्यांचा समावेश असून बस आणि चालत राहुल गांधी लोकांना भेटतील.
यात्रेत मणिपूर, नागालँड, आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओरिसा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांचा समावेश आहे.
भारत जोडो यात्रेत आर्थिक विषमता, ध्रुवीकरण आणि हुकूमशाहीचे मुद्दे उपस्थित केले होते, तर न्याय यात्रा देशातील लोकांसाठी सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय यावर लक्ष केंद्रित करेल.