Rahul Gandhi  Agrowon
ॲग्रो विशेष

Rahul Gandhi : ते पुन्हा आले... सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राहुल गांधींना खासदारकी बहाल

Rahul Gandhi's Lok Sabha Membership Restored : वादग्रस्त वक्तव्यावरून राहुल गांधी यांना गुजरात न्यायालयाच्या निर्णयाने दोषी ठरवले होते. परंतु त्या निर्णयाला शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांना खासदारकी परत केली आहे.

Team Agrowon

Rahul Gandhi Reinstated as Wayanad MP after SC's Relief in Defamation Case : मोदी आडनावाबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावर गुजरात न्यायालयाने दोषी ठरवले. त्यानंतर त्यांच्यावर लोकसभा सचिवालयाने खासदारकी निलंबित केली होती. परंतु शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने गुजरात न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली.त्यानंतर राहुल गांधींच्या खासदारकी परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून आज ते लोकसभेच्या कामकाज सहभागी झाले.

सन २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान कर्नाटकमधील प्रचारसभेत  राहुल गांधींनी मोदी आडनावावरून टिप्पणी केली होती. यावर आक्षेप घेत भाजपाचे नेते पूर्णेश मोदी यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यासंदर्भात राहुल गांधींना गुजरात उच्च न्यायालयाने दोषी ठरवत त्यांना २ वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यामुळे लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींची खासदारकी तातडीने रद्द करण्यात आली होती.

त्यानंतर राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना दोषी ठरवण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राहुल गांधींच्या खासदारकीचा मार्ग मोकळा झाला होता. त्यानुसार आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधींना खासदारकी परत देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात लोकसभा सचिवालयाकडून अधिसूचना काढण्यात आली असून त्यानुसार राहुल गांधींना वायनाड मतदारसंघातली खासदारकी पुन्हा बहाल करण्यात आली. त्यामुळे आजपासूनच राहुल गांधी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच सहभागी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

लोकसभेत मंगळवारी (ता. ८) पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधातल्या अविश्वास ठरावासंदर्भात चर्चा होणार आहे. त्यातही राहुल गांधी सहभागी होणार असल्याने काँग्रेससह इंडिया आघाडीच्या खासदारांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत आहे. तसेच, आज राज्यसभेत दिल्ली सेवा विधेयक मांडलं जाणार असून त्यासंदर्भातही काँग्रेस आक्रमक होण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangli Bank Election : सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू

Urad Harvesting : उडदाचा कापणी, मळणी खर्च परवडेन

Vidarbha Rain Deficit : पश्चिम विदर्भात पावसाची तूट; खरीप पिकांना मोठा फटका

Monsoon Dry Spell : पावसाचा ४५ दिवसांचा खंड!

Crop Insurance Scheme: पीकविमा योजनेतील 'ॲड ऑन कव्हर' पूर्ववत लागू करा; स्वाभिमान, काँग्रेसकडून कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे मागणी

SCROLL FOR NEXT