Rahul Gandhi Defamation Case : सर्वोच्च न्यायालयाकडून राहुल गांधींना दिलासा! नेमका काय निर्णय दिला ?

Remark on Modi Surname : मोदी आडनावाच्या बदनामी प्रकरणात राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायलायने मोठा दिलासा दिला आहे.
Rahul Gandhi
Rahul Gandhi Agrowon

Supreme Court Verdict on Rahul Gandhi : राहुल गांधी यांना मोदी आडनाव बदनामी (Remark on Modi Surname) प्रकरणात गुजरात उच्च न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा दिली होती. या खटल्यात आज सर्वोच्च न्यायालयाने गुजरात उच्च न्यायालयाचा (supreme court ) निर्णयाला स्थगिती दिली आहे. या निर्णयामुळे काॅंग्रेस नेते राहुल गांधींना मोठा दिलासा मिळाला आहे.

राहुल गांधी यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान कर्नाटकमधील जाहीर सभेत मोदी आडनावाबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. 'सगळ्या चोरांचं आडनाव मोदी का आहे?' असे राहुल गांधी म्हणाले होते. यावरुन गुजरात भाजपचे नेते पूर्नेश मोदी यांनी सुरत कोर्टात राहुल गांधींवर मानहानीची तक्रार दाखल केली होती. याप्रकरणात सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवत दोन वर्षे तुरूंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. गुजरात उच्च न्यायालयाने हा निर्णय कायम ठेवल्यानंत लोकसभा सचिवालयाने ओम बिर्ला यांनी त्यांची खासदारकी रद्द केली होती.

राहुल गांधी यांचे वकिल अभिषेक मनु सिंघवी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. यावर आज न्यायालयाने निकाल दिला. न्यायालयाने निर्णय देत असताना म्हटले आहे की, “आडनावाच्या बदनामीच्या खटल्यावर निर्णय देत असताना राहुल गांधींना गुजरात न्यायालयाने सर्वाधिक असलेली दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यांचे संसदेतील सदस्यत्व रद्द व्हावे म्हणून ही शिक्षा सुनावण्यात आली का? त्यापेक्षा एक दिवसाची शिक्षा जरी कमी असती तर त्यांची खासदारकी रद्द झाली नसती. त्यामुळे या प्रकरणातील जास्तीत जास्त दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली हे हेतुपुरस्सर करण्यात आलं का?” असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने विचारला आहे.

कोर्टाच्या या निर्णयामुळे राहुल गांधींचा संसदेत परतण्याचा मार्ग या निर्णयामुळे मोकळा झाला आहे. न्यायालयाने शिक्षा सुनावताना पूर्ण विचार केला नाही असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com