Rahul Gandhi, Priyanka Gandhi Agrowon
ॲग्रो विशेष

Rahul Gandhi, Priyanka Gandhi : तेलंगणातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या घोषणेनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधी यांची प्रतिक्रिया

Telangana Farmers Loan Waived Off : तेलंगणा सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देताना २ लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफी करण्याची घोषणा केली. त्यानंतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

Aslam Abdul Shanedivan

Pune News : तेलंगणाच्या राज्यातील काँग्रेसच्या मुख्यमंत्री रेवंत रेड्डी सरकारने शेतकऱ्यांना दिलासा दिला. २ लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफी करण्याची घोषणा मुख्यमंत्री रेड्डी शनिवारी (ता.२२) यांनी केली. त्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वड्रा यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. तेलंगणातील अन्नदात्यांचे आम्ही अभिनंदन करतो. तर आम्ही 'जे सांगितलं ते केलं' असे ट्विटमधून राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे. 

'किसान न्याय' ची प्रतिज्ञा पूर्ण केली

तेलंगणातील कर्जमाफीच्या घोषणेनंतर राहुल गांधी यांनी, राज्यातील शेतकरी कुटुंबांचे अभिनंदन. काँग्रेस सरकारने तुमचे २ लाख रुपयांपर्यंतचे सर्व कर्ज माफ करून 'किसान न्याय' ची प्रतिज्ञा पूर्ण केली. आम्ही आमच्या आश्वासनांच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल उचलले. या कर्जमाफीमुळे ४० लाखांहून अधिक शेतकरी कुटुंबे कर्जमुक्त होतील असे म्हटले आहे. 

तर जे काही सांगितलं होतं, ते मी केलं. हा माझा हेतू आहे. हीच माझी सवय आहे. काँग्रेस सरकारचा अर्थच हा आहे की, राज्याची तिजोरी शेतकरी आणि मजुरांसह वंचित समाजाच्या बळकटीच्या खर्चाची हमी. तेलंगणा सरकारचा हा निर्णय हे याचे उदाहरण आहे. आमचे वचन आहे की, काँग्रेस जिथे जिथे सरकार असेल तिथे भारताचा पैसा ‘भांडवलदारांवर’ नाही तर ‘भारतीयांवर’ खर्च केला जाईल. 

आमच्या सरकारने आश्वासन पूर्ण केले

तर काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी देखील कर्जमाफीच्या घोषणेवर ट्विट केले आहेत. प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे की, तेलंगणातील काँग्रेस पक्षाने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले होते. आमच्या सरकारने शेतकऱ्यांची कर्जे माफ करण्याचा निर्णय घेतला. आमच्या सरकारने आश्वासन पूर्ण केले. त्यामुळे कर्जबाजारी ४० लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

देशातील सर्व संपत्ती देशातील जनतेची असून ती केवळ लोकांच्या हितासाठीच खर्च झाली पाहिजे, असे काँग्रेसचे मत असल्याचे प्रियंका गांधी म्हणाल्या. तसेच आम्ही राजस्थान आणि छत्तीसगडमधील शेतकऱ्यांचे कर्जही माफ केले होते. केंद्रात आमचे सरकार असताना देशभरातील शेतकऱ्यांचे ७२ हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले होते. काँग्रेस पक्ष शेतकरी, कामगार, आदिवासी, दलित, वंचित आणि मध्यमवर्गीयांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असल्याचेही प्रियंका गांधी म्हणाल्या.

कर्जमाफी लवकरच लागू केली जाईल

तेलंगणाचे मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी म्हणाले की, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमुळे राज्याच्या तिजोरीवर ३१ हजार कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. तर मागील बीआरएस सरकारनेही अशीच एक योजना जाहीर करत १ लाख रुपयांच्या कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मात्र ते त्यांनी पूर्ण केले नाही. त्यामुळे शेतकरी व शेती अडचणीत आली आहे. मात्र आमच्या "सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी कर्जमाफीचा निर्णय घेतला. सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी लवकरच शेतकऱ्यांसाठी लागू केली जाईल,  असेही मुख्यमंत्री रेड्डी म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Rate In Maharashtra : कांदा निर्यात धोरणामुळेच दर घसरले असे म्हणता येणार नाही; लोकसभेत केंद्र सरकारचे स्पष्टीकरण

Opposition MPs Protest: विरोधी खासदारांची काळे कपडे घालून संसद परिसरात निदर्शने, लोकसभा, राज्यसभेचे कामकाज तहकूब

El Nino Update : एल निनो मार्च २०२७ पर्यंत टिकण्याची ९७ टक्के शक्यता; अमेरिकेच्या हवामान संस्थेचा अंदाज

Rainwater Harvesting: पर्जन्यजल संधारण : महत्त्व, नियोजन अन् प्रभावी व्यवस्थापन

Smart Mango Farming: ९० एकरांतील व्यवस्थापन तंत्रज्ञानामुळे झाले सुलभ

SCROLL FOR NEXT