Ragi  Agrowon
ॲग्रो विशेष

Ragi Cultivation : नाचणी लागवडीस सिंधुदुर्गात प्रारंभ

Ragi Farming : सिंधुदुर्ग जिल्ह्यात भातरोप पुनर्लागवड पूर्ण झाल्यानंतर आता शेतकऱ्यांनी नाचणी लागवडीला प्रारंभ केला आहे.

Team Agrowon

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यात भातरोप पुनर्लागवड पूर्ण झाल्यानंतर आता शेतकऱ्यांनी नाचणी लागवडीला प्रारंभ केला आहे. जिल्ह्यात सुमारे ३ हजार हेक्टरवर नाचणी लागवड केली जाते.

जिल्ह्यात खरीप हंगामात भातपीक आणि नाचणी पिकाची लागवड अधिकतर केली जाते. यावर्षी भातरोप पुनर्लागवड अखंडपणे झाल्यामुळे ती वेळेत पूर्ण झाली. गेल्या आठवड्यात भातरोप पुनर्लागवड पूर्ण झाल्यानंतर आता शेतकऱ्यांनी नाचणी पीक लागवडीला प्रारंभ केला आहे.

जिल्ह्यातील वैभववाडी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी आणि दोडामार्ग, देवगड या तालुक्यांमध्ये नाचणी लागवड अधिक होते. या भागात पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकऱ्यांनी नाचणी रोप लागवडीचे काम हाती घेतले आहे.

कोकणात साधारणपणे टोकण पद्धतीने नाचणी रोप लागवड केली जाते. आतापर्यंत दहा टक्के लागवड पूर्ण झाली आहे. पावसाचे प्रमाण कमी राहिल्यास येत्या आठवड्यात रोप लागवड पूर्ण होण्याचा अंदाज आहे.

मधुमेहामुळे नाचणीचे प्रमाण वाढतेय

जिल्ह्यात सात आठ वर्षांपूर्वी नाचणी लागवडीखालील क्षेत्र घटू लागले होते. परंतु मधुमेहाच्या रुग्णांच्या आहारात नाचणीचा वापर करण्यात येत असल्यामुळे नाचणी लागवडीखालील क्षेत्र जिल्ह्यात पुन्हा वाढू लागले आहे. काही महिला बचत गट देखील समूह पद्धतीने नाचणी लागवड करू लागले आहेत. त्यामुळे नाचणी लागवडीखालील क्षेत्र वाढू लागले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ahilyanagar Market Update : अहिल्यानगरच्या बाजारपेठेत तेजी! रताळे, बटाट्यासह पालेभाज्यांना ग्राहकांची मोठी मागणी

Cattle Fodder Camps : पशुधनाचा जीव टांगणीला! चारा छावण्यांबाबत सरकारनं तातडीने निर्णय घ्यावा; बाळासाहेब थोरातांची मागणी

Fodder Management : दुष्काळाचे संकट! पशुधनाला वाचवण्यासाठी करा चारा-पाण्याचे असे अचूक नियोजन

Latur Gaal Upsa Parvanagi: लातूरमध्ये गाळ उपशास ऑनलाइन परवानगी

Marigold Price Crash : सणासुदीला झेंडूच्या फुलांची मातीमोल विक्री; बाजारात शेतकऱ्यांच्या कष्टाची होतेय अवहेलना!

SCROLL FOR NEXT