Raghunathdada Patil Agrowon
ॲग्रो विशेष

Raghunathdada Patil : आगामी निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवू : रघुनाथदादा

Agriculture Law : केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. शेतीविषयक कायदे दुरुस्त करण्यासाठी एकत्र येऊ. २०२४ च्या निवडणुकीत सत्ताधारी सरकारला त्यांची जागा दाखवून देऊ.

Team Agrowon

Sangli News : ‘‘केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. शेतीविषयक कायदे दुरुस्त करण्यासाठी एकत्र येऊ. २०२४ च्या निवडणुकीत सत्ताधारी सरकारला त्यांची जागा दाखवू,’’ असा इशारा भारतीय किसान संघ परिसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी दिला.

सांगली येथील विष्णुदास भावे नाट्य मंदिरात छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त शेतकरी मेळावा झाला, त्या वेळी ते बोलत होते.

संघटना कार्याध्यक्ष कालिदास आपटे, उपाध्यक्ष ॲड. अजित काळे, शिवाजी नांदखिले, महिला आघाडी अध्यक्षा वंदना माळी, हणमंतराव पाटील, महादेव कोरे, नंदकुमार पाटील, रमेश सोनवणे, परशुराम माळी, संजय रावळ आदी उपस्थित होते. क्रांतिवीर अप्पासाहेब ऊर्फ राजाराम भाऊराव पाटील प्रतिष्ठान, साखराळे यांच्यातर्फे ॲड. सुभाष खंडागळे यांचा गौरव करण्यात आला.

रघुनाथदादा पाटील म्हणाले, की शेतीमालाचा भाव का वाढत नाही, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. शेतीमालाचे दर जाणीवपूर्वक पाडले जात आहेत. राज्यात आणि केंद्रात जे-जे सरकार स्थापन झाले, त्या सरकारने आपल्या हिताचे कायदे करून राज्यकर्ते मोठे झाले. बदलत्या कायद्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी केली आहे. कायद्यात दुरुस्ती झाली तर शेतीमालाला चांगले दर मिळतील.

प्रमुख मागण्या...

- गोवंश हत्या व वन्यजीव संरक्षण कायदा रद्द करावा

- दोन साखर कारखान्यांतील व इथेनॉल प्रकल्पातील आंतर रद्द करा व ऊस व साखर उपपदार्थांवरील कर रद्द करा

-गुंठेवारी खरेदी-विक्रीवरील बंधने काढून टाका

- गोपीनाथ मुंडे ऊस तोडणी कामगार महामंडळाची प्रतिटन दहा रुपयांप्रमाणे होणारी कपात रद्द करा

-शेतकऱ्यांना वीजबिलातून व कर्जातून मुक्त करा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Supply Schemes Issue: निधीअभावी जलजीवन मिशनच्या ६८ पाणीपुरवठा योजना रखडल्या

Cotton Farming Techniques: हेक्टरी १२ ते १४ क्विंटल कापूस उत्पादनाचे उद्दिष्ट; शास्त्रीय तंत्रज्ञानाचा अवलंब करा

Farmer Loan Waiver: नांदेडमध्ये एक लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्ती

PM Kisan 24th Installment: शेतकऱ्यांना दिवाळीआधी २ हजार मिळणार; 'पीएम किसान'च्या २४ व्या हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर

Food Conservation: अन्नाची बचत हीच अन्ननिर्मिती; अन्न-पाण्याची नासाडी टाळा : डॉ. इंद्र मणी मिश्रा

SCROLL FOR NEXT