Farm Law : दिल्लीच्या शेतकरी आंदोलनात शेतकरी नाही, तर खलिस्तानी, देशद्रोही होते; भाजप आमदार बबनराव लोणीकरांच विधान

केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांविरोधातील आंदोलन शेतकऱ्यांनी नाही , तर खलिस्तानी आणि देशद्रोह्यांनी केल्याचे वादग्रस्त विधान भाजप आमदार बबनरावव लोणीकर यांनी केले आहे.
Babanrao Lonikar
Babanrao LonikarAgrowon
Published on
Updated on

Delhi Farmers Protest केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांविरोधातील (Farm Law) आंदोलन शेतकऱ्यांनी (Farmers Protest) नाही , तर खलिस्तानी आणि देशद्रोह्यांनी केल्याचे वादग्रस्त विधान भाजप आमदार बबनरावव लोणीकर (Babanrao Lonikar) यांनी केले आहे.

जालना जिल्ह्यातील परतूर येथील एका कार्यक्रमात बोलताना लोणीकर यांनी हे विधान केले आहे. याआधिही महावितरणच्या अधिकाऱ्याला शिवीगाळ आणि धमकी दिल्याप्रकरणी लोणीकर चर्चेत आले होते.

Babanrao Lonikar
Ajit Pawar : "दुधाच्या धंद्यामुळे माझं बस्तान बसलं" - अजित पवार

मोदी सरकारने केलेले कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या हिताचे होते. परंतु पंजाब या एका राज्यातील शेतकऱ्यांनीची या कायद्यांना विरोध केला होता, असे लोणीकर म्हणाले.

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांचे गोडवे गाणाऱ्या लोणीकर यांनी या कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलन हे खलिस्तानी आणि देशद्रोह्यांचे असल्याचे म्हटले.

त्यावेळी कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनात खलिस्तानी लोकांनी आंदोलन केले. त्यावेळी कमांडोंनी गोळ्या असत्या तर, शेतकऱ्यांना गोळ्या घातल्या असं म्हणालाया विरोधक मोकळे झाले असते. मात्र, केंद्र सरकारने हे आंदोलन संवेदनशीलपणे हाताळ्याचे लोणीकर म्हणाले.

Babanrao Lonikar
Abdul Sattar News: कृषिमंत्र्यांच्या वादग्रस्त विधानावरून विरोधक आक्रमक

लोणीकर पुढे म्हणाले की, शेतकरी आंदोलनावेळी खलिस्तानी संघटनांनी तलावरी घेवून लाल किल्ल्यावर आंदोलन केले. त्याठिकाणी त्यांनी खलिस्तानचा झेंडा फडकावला. त्यावेळी जर कंमांडोंनी गोळ्या घातल्या असत्या तर विरोधकांनी शेतकऱ्यांवर गोळ्या घातल्याचा आरोप केला असता.

दरम्यान, आपल्या वादग्रस्त विधानांसाठी परिचित असणाऱ्या लोणीकर यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्याला धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती.थकीत वीजबिलासाठी बंगल्याची वीज कापणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्याला लोणीकर यांनी शिवीगाळ केली होती.

तसेच या अधिकाऱ्याला आयकर विभागाची धाड टाकण्याची धमकीही दिली होती. शासकीय अधिकाऱ्याला धमकी देणे आणि आक्षेपार्ह भाषा आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा तत्कालीना ऊर्जामंत्री डॉ. नितीनयांनी दिला होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com