Radhakrishna Vikhe Patil  Agrowon
ॲग्रो विशेष

Radhakrishna Vikhe Patil : शेतकऱ्यांचा विकास हेच सरकारचे ध्येय : विखे पाटील

Radhakrishna Vikhe Patil Speech : भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री श्री विखे पाटील यांच्या हस्ते झाले.

Team Agrowon

Maharashtra News : समाजासाठी सरकार काम करतेय. नगर जिल्ह्याच्या विकासासाठी परिपूर्ण असा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यास मूर्त स्वरूप देऊन जिल्ह्याचा औद्योगिक, पर्यटन विकास, नवीन रोजगाराच्या संधी निर्माणाबरोबरच विशेष उपक्रम राबवून सर्वांगिण विकास साधता येईल. शेतकरी विकास हेच सरकारचे मुख्य ध्येय आहे, असे मत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.

नगर येथे जिल्हा पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजवंदन झाले. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

विखे पाटील म्हणाले, की प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा अशी देशाची प्रगती सुरू आहे. देशाच्या मातृभूमीविषयीची कायम कृतज्ञता आणि या वीरांच्या योगदानाचे स्मरण व्हावे म्हणून ‘माझी माती माझा देश’ अभियान सुरू आहे. ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमातून शासनाच्या विविध योजनांचा लाभ राज्यातील जनतेपर्यंत प्रत्यक्ष पोहोचविण्यात येत आहे.

शेतकरी विकास हेच राज्य सरकारचे ध्येय आहे. राज्य शासनाने देशात पहिल्यांदा शेतकऱ्यांसाठी केवळ एक रुपयामध्ये पीकविमा राबविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नगर जिल्ह्यातील ११ लाख शेतकऱ्यांनी या पीकविमा योजनेत सहभाग घेतला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘हर घर नल योजना’ राबविण्यात येत आहे. जलजीवन मिशनच्या माध्यमातून या योजनेसाठी नगर जिल्ह्यात ४ हजार कोटी रुपयांच्या निधीद्वारे पाणी पुरवठ्याची कामे केली जात आहेत. मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रमामध्ये जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे.

छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती शिबिराच्या माध्यमातून ५ हजार ९८९ युवकांना करिअर संधीचा, तर तीन रोजगार मेळाव्याद्वारे १ हजार १३० युवकांना रोजगाराची संधी प्राप्त झाली आहे. पोलिस उपनिरीक्षक अंबादास सुखदेव हुलगे, पोलिस निरीक्षक दिनेश विठ्ठल आहेर यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Land Survey Protest: ‘शक्तिपीठ’च्या मोजणीचा डाव शेतकऱ्यांनी हाणून पाडला

Agriculture Production: खानदेशात उडीद, मूग उत्पादन कमी

Sugarcane Farmers Crisis: थकीत ऊसबिलांमुळे कारखान्यांसमोर ऊस मिळविण्याची मोठी कसोटी

Sunetra Pawar Visit: शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदतीसाठी प्रयत्न करणार: सुनेत्रा पवार

Bhamragad Flood Crisis: भामरागडमध्ये पूर; ५२५ नागरिकांचे स्थलांतर

SCROLL FOR NEXT