Animal Vaccination Agrowon
ॲग्रो विशेष

Animal Vaccination : पशुसंवर्धन विभागामार्फत रेबीज रोगप्रतिबंधात्मक लसीकरण

Team Agrowon

Raigad News : पशुसंवर्धन विभागामार्फत रायगड जिल्ह्यातील पाळीव कुत्रे, मांजरी व घोडे आदी तब्बल १,३५९ प्राण्यांना रेबीज रोगप्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले. नुकतीच विशेष मोहीम राबवण्यात आली असून तज्‍ज्ञांनी रेबीजबद्दल माहिती देत जनजागृती करण्यात आली.

रेबीजबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी तसेच प्राणघातक आजारापासून वाचवण्यासाठी जागतिक रेबीज दिन साजरा केला जातो. पशुसंवर्धन विभागामार्फत रायगड जिल्ह्यातील पाळीव कुत्रे, मांजरी आणि घोडे यांना रेबीज रोगप्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले असून जिल्ह्यातील शाळांमध्ये रेबीज रोगाबाबत जनजागृती करण्यात आल्‍याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सचिन देशपांडे यांनी दिली.

विषाणूजन्य असलेल्‍या रेबीज हा आजार लसीद्वारे रोखता येतो. हा झुनोटिक आजार माणसामध्ये एखाद्या रेबीज झालेल्या प्राण्याच्या चाव्याद्वारे किंवा ओरखड्यांद्वारे पसरतो आणि मध्यवर्ती मज्जासंस्थेवर परिणाम करतो.

क्लिनिकल लक्षणे दिसू लागल्यास रेबीज प्राणघातक ठरू शकतो. जागतिक आरोग्‍य संस्‍थेने २०३० पर्यंत श्‍वानदंश-रेबीजमुळे होणारे मृत्यू संपवण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.

रेबीज प्रतिबंधात्मक लस पशू व माणसांसाठी महत्त्वाची असल्‍याचे जिल्हा पशुवैद्यकीय सहाय्यक आयुक्त डॉ. अजय कांबळे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Incentive Scheme : कर्जमुक्ती प्रोत्‍साहन योजनेचा ४२४ शेतकऱ्यांना लाभ

Paddy Farming : चांगल्या पावसामुळे भातशेती बहरली

Solar Pump Scheme : मागेल त्याला सौर कृषिपंपांचा ५० हजार शेतकऱ्यांना लाभ

Crop Insurance : विमा भरपाईपोटी २७.७३ कोटींचा लाभ

Latur Gramin Assembly : गेल्या निवडणुकीतील चूक आता नाही : लोणीकर

SCROLL FOR NEXT