Rabi Season Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Season 2024 : मराठवाड्यात रब्बी पेरणीची गती मंद

Rabi Sowing : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत केवळ ७९ हजार १३ हेक्टरवरच रब्बीची पेरणी झाली आहे.

Team Agrowon

Chh. Sambhajinagar News : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत केवळ ७९ हजार १३ हेक्टरवरच रब्बीची पेरणी झाली आहे. पावसाळ्याच्या अखेरच्या टप्प्यात व पावसाळा संपल्यानंतर आलेल्या जोरदार पावसाने अनेक भागात पेरण्या खोळंबविण्याचे काम केले आहे.

मराठवाड्यातील लातूर व छत्रपती संभाजीनगर या दोन विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या आठ जिल्ह्यात रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र २१ लाख ५ हजार ११० हेक्टर इतके आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर कृषी विभागातील तीन जिल्ह्यातील ७ लाख ४१ हजार १८० हेक्टरसह लातूर कृषी विभागातील पाच जिल्ह्यातील १३ लाख ६३ हजार ९३० हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.

लातूर कृषी विभागातील पाचही जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत २२ हजार ९९१.५० हेक्टरवरच रब्बीची पेरणी झाली आहे. त्यामध्ये लातूरमधील ८५३ हेक्टरसह धाराशिवमधील ३६३५ हेक्टर, नांदेडमधील ३१६ हेक्टर, परभणीतील १३ हजार ८६४.५० हेक्टर तर हिंगोलीतील ४३२३ हेक्टरवरील प्रत्यक्ष पेरणी झालेल्या क्षेत्राचा समावेश आहे.

छत्रपती संभाजीनगर कृषी विभागातील तीन जिल्ह्यात ५६ हजार २२.९० हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत १२ हजार ६५० हेक्टर, जालनामध्ये ५३४४ हेक्टर तर बीडमध्ये ३८ हजार हेक्टर वर पेरणी झालेल्या क्षेत्राचा समावेश आहे. आता पाऊस उघडल्याने यापुढील काळात पेरणीची गती वाढण्याची शक्यता आहे.

पीकनिहाय पेरणी स्थिती (हेक्टरमध्ये)

छत्रपती संभाजीनगर विभाग

रब्बी ज्वारी ४४ हजार ४५४

गहू ४४०

मका २१७४

इतर तृणधान्य २८

हरभरा ७१४४

इतर कडधान्य १७६०

करडई ६.४

सूर्यफूल ६

इतर गळीत धान्य १०

लातूर विभाग

रब्बी ज्वारी ११,७०९

गहू १६०

हरभरा १०४०५

करडई २५५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Cultivation : सांगली जिल्ह्यात उसाची ३१ हजार हेक्टरवर लागवड

Cashew Subsidy : काजू अनुदान अर्ज भरण्यासाठी राहिले केवळ चार दिवस

NCP Sharad Pawar Candidate 3rd List : कृषिमंत्र्यांच्या विरोधात शरद पवारांनी शिलेदार मैदानात उतरवला; परळीतून राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी

Water Storage : नंदुरबार जिल्ह्यातील अनेक बंधारे भरले; भूजल पातळी वाढण्याची शक्यता

Agriculture Theft : शिवारातून कापसासह केळी, शेती यंत्रणांची चोरी

SCROLL FOR NEXT