Rabi Season 2024 : सांगलीत रब्बीचा २२ टक्के पेरा

Rabi Sowing : परतीच्या पावसामुळे रब्बी हंगामातील पेरणीला फारशी गती आली नसल्याचे चित्र आहे. रब्बीचा ४३ हजार ११० हेक्टरवर पेरा झाला आहे.
Rabi Sowing
Rabi Sowing Agrowon
Published on
Updated on

Sangli News : जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे रब्बी हंगामातील पेरणीला फारशी गती आली नसल्याचे चित्र आहे. रब्बीचा ४३ हजार ११० हेक्टरवर पेरा झाला आहे. वाफसा नसल्याने रब्बीच्या पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत. ज्वारीची सर्वाधिक पेरणी झाली आहे.

जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र १ लाख ९१ हजार ११६ हेक्टर आहे. परतीचा पाऊस सुरू झाला की, दुष्काळी पट्ट्यातील जत, खानापूर, तासगाव, आटपाडी, कवठेमहाकंळ या तालुक्यांत रब्बी ज्वारीची पेरणी सुरू होते. त्यानुसार या तालुक्यात ज्वारीच्या पेरणीला शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून दुष्काळी पट्ट्यात ज्वारीची पेरणी सुरू झाली. पेरणी झालेली पिकांची उगवण झाली आहे.

Rabi Sowing
Rabi Season 2024 : यंदा साडेतीन लाख हेक्टरवर रब्बीचे बुलडाण्यात नियोजन

जिल्ह्यात ज्वारीचे सरासरी क्षेत्र १ लाख २६ हजार ९६६ हेक्टर असून ३६९३९ हेक्टरवर पेरा झाला आहे. गहू, हरभरा या पिकांची अत्यल्प पेरा झाला आहे. मात्र, दुसऱ्या आठवड्यापासून परतीचा पाऊस सुरू झाला. शेतात पाणी साचले.

त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीचे नियोजन थांबवले असल्याचे चित्र आहे. दरम्यान, जिल्ह्यात सतत पाऊस पडल्याने पेरणी केलेल्या पिकात पाणी साचल्याने काही प्रमाणात पिकांचे नुकसानही झाले आहेत. पलूस तालुक्यात सर्वांत कमी पेरणी झाली आहे.

Rabi Sowing
Rabi Season : परभणी जिल्ह्यात रब्बी पिकांच्या पेरण्या लांबणीवर

जिल्ह्यात १ ते २२ ऑक्टोबर या काळात सरासरी १३३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. अनेक भागात पावसामुळे पेरणी पूर्व मशागतीही खोळंबल्या आहेत. त्याचच ज्या शेतकऱ्यांनी पेरणीसाठी शेत तयार केले आहे, त्याठिकाणी पाणी साचले आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांच्या पेरण्या रखडल्या आहेत. त्यामुळे यंदाच्या रब्बी हंगामात लांबणीवर पडणार असून गहू आणि हरभरा पिकांच्या पेरण्याही कमी होतील, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

तालुकानिहाय रब्बी हंगामातील पिकांच्या झालेल्या पेरण्या

तालुका पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)

मिरज १०८५

जत ३२३८७

खानापूर ९२५

वाळवा २०२

तासगाव ६९

शिराळा १५०

आटपाडी ५४६३

कवठेमहांकाळ २६८०

पलूस ६

कडेगाव १४३

एकूण ४३११०

पीक पेरणी क्षेत्र

ज्वारी ३६९३९

मका ५८२८

हरभरा २६६

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com