Rabi Sowing  Agrowon
ॲग्रो विशेष

Sangli Rabi Sowing : सांगलीत रब्बी पेरण्या लांबणीवर पडण्याची शक्यता

Rabi Season : सांगली जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने खरीप पिकांची काढणी लांबणीवर पडली आहे. यामुळे यंदाच्या रब्बी हंगामातील पूर्व मशागती खोळंबल्या आहेत.

Team Agrowon

Sangli News : सांगली जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने खरीप पिकांची काढणी लांबणीवर पडली आहे. यामुळे यंदाच्या रब्बी हंगामातील पूर्व मशागती खोळंबल्या आहेत. गेल्या चार ते पाच दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. येत्या आठ दिवसांत खरिपातील पिकांच्या काढणीला वेग येणार आहे. मात्र वाफसा नसल्याने पूर्व मशागती रखडल्या असून पेरणी काहीशी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. रब्बीमध्ये पाणीटंचाई भासणार नसल्याने हंगाम चांगला साधणार असल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे.

जिल्ह्यात यंदा वेळेत पाऊस सुरू झाल्याने खरिपाच्या पेरण्या शेतकऱ्यांनी वेळेत केल्या. त्यामुळे खरिपाचा पेरा २ लाख ४० हजार १९० हेक्टरवर झाला. जुलै आणि ऑगस्टमध्ये दमदार पाऊस झाला. या पावसाने दुष्काळी भागातही सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. जिल्ह्यातील वाळवा, मिरज, पलूस आणि शिराळा तालुक्यात अतिपावसाचा फटका बसला. त्यामुळे सोयाबीन, भात, भुईमूग पिकाचे नुकसान झाले. इतर पिकांची वाढ चांगली झाली आहे. पंधरा दिवसांपूर्वी सर्वदूर परतीच्या पावसाने हजेरी लावली. परिणामी, खरिपातील पिकांची काढणी लांबणीवर पडल्या.

या पावसामुळे रब्बी हंगामासाठी पूर्व तयारीला ब्रेक लागला होता. गेल्या चार ते पाच दिवसांपासून पावसाने पुन्हा उघडीप दिली आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांच्या काढणीला गती आली आहे. सोयाबीनची काढणी सुरू झाली आहे. त्यामुळे वाळवा, शिराळा, पलूस, मिरज तालुक्यांत रब्बी हंगामातील पूर्वमशागती लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. जत, कवठेमहांकाळ, आटपाडी तालुक्यांत मूग आणि उडीद पिकाची काढणी अंतिम टप्प्यात असून, बाजरी पिकाची काढणी सुरू आहे.

हंगामासाठी मुबलक पाणी

जिल्ह्यात सर्व दूर सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने पाणी पातळीही काहीशी वाढली आहे. जिल्ह्यात ८३ मध्यम व लघू प्रकल्प आहेत. या प्रकल्पातही पाणीसाठा वाढला आहे. त्यामुळे दुष्काळी भागात रब्बी हंगामासाठी पाण्याची उपलब्धताही झाली असल्याने रब्बी हंगामात पाण्याची टंचाई भासणार नसल्याचे चित्र आहे.

कृषी विभागाकडून तयारी सुरू

रब्बी हंगामाची तयारी सुरू झाली आहे. जिल्ह्याचे रब्बी हंगामाचे सरासरी क्षेत्र १ लाख ९५ हजार ६०० हेक्टर आहे. यंदा रब्बीत २ लाख ९ हजार हेक्टरवर पेरणीचे नियोजन आहे. त्यासाठी ज्वारी, गहू, हरभरा यांसह अन्य बियाणे आणि खते यांची मागणीही केली आहे. रब्बी हंगामात बियाणे आणि खतांची कमतरता भासणार नाही याची देखील दक्षता कृषी विभागाने घेतली आहे.

खरीप हंगामात पावसामुळे पिके हाती लागली आहेत. बाजरीची काढणी पूर्ण झाली आहे. पुन्हा पाऊस झाल्याने वाफसा आल्यानंतर ज्वारीची पेरणी करणार आहे.
आनंदा पवार, येळवी, ता. जत

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचा जोर ओसरणार

Sugar Rate : श्रावणातील वाढत्या मागणीमुळे साखरेचे दर वाढण्याची शक्यता

Cooperative Institute Maharashtra : सहकारी संस्था चांगल्या पद्धतीने चालल्या पाहिजेत

Agriculture Scheme : कृषी स्वावलंबन, कृषिक्रांती योजनेकडे शेतकऱ्यांचा कल

Fertilizer Stock : युरिया, डीएपी खतांचा साठा शेतकऱ्यांसाठी खुला

SCROLL FOR NEXT