Nanded News : नांदेड जिल्ह्यात ऑगस्टच्या शेवटी सप्टेंबरच्या प्रारंभी झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रकल्पातील पाणीसाठा वाढला आहे. तर लघू प्रकल्पासह मध्यम प्रकल्पासह लघू प्रकल्पही तुडुंब भरले आहेत. जिल्ह्यातील १०४ प्रकल्पातील पाणीसाठा ५७९.१३ दलघमीनुसार ७९.५४ टक्के असल्याची माहिती नांदेड पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली.
नांदेड जिल्ह्यात यंदा जून महिन्यात समाधानकारक पावसाअभावी धरणसाठ्यात कमालीची घट झाली होती. ८० प्रकल्प असलेल्या लघू प्रकल्पात तसेच नऊ प्रकल्प असलेल्या मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा तळाला गेला होता.
यानंतर मात्र जिल्ह्यात पावसाचे दमदार आगमन झाले. ऑगस्ट व सप्टेंबरच्या पहिल्या तीन दिवसात तुफान पाऊस झाल्याने ८०८.१० मिलीमीटरनुसार वार्षिक सरासरी ९०.६७ टक्क्यांपर्यंत पोचली. सध्या जिल्ह्यात मोठा प्रकल्प असलेल्या
विष्णुपुरी प्रकल्पात ७८.४६ दलघमीनुसार ९७ टक्के पाणीसाठा झाला आहे. तर दुसरा मोठा प्रकल्प असलेल्या मानार (बारुळ) प्रकल्पात १३८.२१ दलघमीनुसार १०० टक्के पाणीसाठा झाला आहे. यासोबतच जिल्ह्यातील नऊ मध्यम प्रकल्पात १३५.५५ दलघमीनुसार ९७ टक्के पाणीसाठा झाला आहे.
चार कोल्हापुरी बंधाऱ्यात शून्य टक्के पाणीसाठा आहे, ८० लघू प्रकल्पात१६४.९३ दलघमीनुसार ९५ टक्के पाणीसाठा आहे. नऊ उच्च पातळी बंधाऱ्यात ६१.९८ दलघमीनुसार ३२ टक्के पाणीसाठा आहे. जिल्ह्यात एकूण १०४ प्रकल्पात ५७९.२३ दशलक्ष घनमीटरनुसार ७९.५४ टक्के पाणीसाठा झाला आहे. यासोबतच नांदेड जिल्ह्याशेजारी असलेल्या परभणी जिल्ह्यातील येलदरी प्रकल्पात ६१५.७२ दलघमीनुसार ७६ टक्के पाणीसाठा झाला आहे. तर सिद्धेश्वर प्रकल्पात ८०.९६ दलघमीनुसार १०० टक्के पाणीसाठा झाला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.