Rabi Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Sowing : माजलगावात रब्बीची पेरणी निम्म्यावर

Rabi Season : या वर्षी कमी झालेल्या पावसामुळे तालुका परिसरात रब्बीची पेरणी निम्यानेच घटली आहे. मागील वर्षी दोन हजार हेक्टरवर रब्बीची लागवड झाली होती.

Team Agrowon

Beed News : या वर्षी कमी झालेल्या पावसामुळे तालुका परिसरात रब्बीची पेरणी निम्यानेच घटली आहे. मागील वर्षी दोन हजार हेक्टरवर रब्बीची लागवड झाली होती. परंतु, यावर्षी फक्त एक हजार १८० हेक्टरवर ज्वारी आणि हरभरा या दोनच पिकांची पेरणी झाली आहे.

तालुक्यामध्ये यावर्षी खरीप हंगामाच्या सुरवातीपासूनच अत्यल्प पाऊस झाला तर खरीप हंगामातील सोयाबीन पिकाला अत्यल्प उतारा आला. शेतकऱ्यांना उत्पादन खर्च निघणेही अवघड झाले आहे. कपाशीची लागवड यावर्षी खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर झाली होती. पाण्याची उपलब्धता असलेल्या बागायती क्षेत्रावर कापूस चांगल्या प्रमाणावर फुटला आहे.

मात्र, जिरायती क्षेत्रावरील कापूस पहिल्या वेचणीतच संपणार आहे. परतीचा पाऊस देखिल पडला नसल्याने यावर्षी धरणामध्ये केवळ साडे अकरा टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. धरणातील पाणीसाठा शासनाने आरक्षीत केला आहे.

रब्बी हंगामामध्ये मागील वर्षी दोन हजार हेक्टरवर लागवड झाली होती. परंतु, यावर्षी असलेल्या अत्यल्प पावसामुळे यावर्षी एक हजार १८० हेक्टरवर शेतकऱ्यांनी रब्बीची पेरणी केली असून, यामध्ये ज्वारी आणि हरभरा या दोन पिकांचा समावेश आहे.

ऊस उपलब्धतेची समस्या

यावर्षी विंधन विहिरीला पाणीसाठा अत्यल्प आहे. शिवाय माजलगाव धरणात केवळ साडेअकरा टक्केच पाणीसाठा असल्याने शेतकऱ्यांनी नविन उसाची लागवड यावर्षी अत्यल्प प्रमाणात केली आहे. परिणामी, पुढील वर्षी साखर कारखानदारांसमोर ऊस उपलब्धतेची समस्या राहणार आहे.

धरणातून आवर्तने नाही

मागील चार ते पाच वर्षांपासून सतत धरण भरत असल्यामुळे रब्बी हंगामात चार आणि उन्हाळी हंगामात तीन असे सात आवर्तने शेतीसाठी धरणातून मिळत होते. परंतु, यावर्षी अत्यल्प झालेल्या पावसामुळे धरणात कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे रब्बीला देखिल आवर्तने मिळणार नाही.

तालुक्यात या वर्षी रब्बीची पेरणीही कमीच झालेली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी निम्याने पेरणी कमी झाली असून ज्वारी, गहू, हरभरा, सूर्यफूल आदी पिकांची मागील वर्षी लागवड झाली होती. यावर्षी एक हजार १८० हेक्टरवर ज्वारी आणि हरभरा या दोनच पिकांची लागवड झाली आहे.
- प्रकाश चव्हाण, कृषी पर्यवेक्षक, माजलगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT