Rabi Season Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Season 2024 : यंदा साडेतीन लाख हेक्टरवर रब्बीचे बुलडाण्यात नियोजन

Rabi Sowing : यंदाच्या मोसमात चांगला पाऊस झालेला असल्याने धरणे तुडुंब भरली. शिवाय आता परतीचा पाऊसही धुमाकूळ घालतो आहे.

Team Agrowon

Buldana News : यंदाच्या मोसमात चांगला पाऊस झालेला असल्याने धरणे तुडुंब भरली. शिवाय आता परतीचा पाऊसही धुमाकूळ घालतो आहे. या सततच्या पावसाने खरीप पिकांचे नुकसान होत आहे. मात्र, हाच पाऊस आगामी रब्बीसाठी पोषक ठरणारा आहे. त्यामुळे जिल्ह्यात यंदाच्या रब्बीत तीन लाख ५४ हजार हेक्टरवर लागवड अपेक्षित धरली जात आहे. कदाचित हे क्षेत्र आणखी वाढेल, असाही अंदाज आहे.

यावर्षी सततच्या पावसाने पिकांचे नुकसान झालेले आहे. आताही पाऊस होत आहे. वाफसा नसल्याने शेती तयार करायलाही विलंब लागतो आहे. अशी स्थिती बनलेली आहे. येत्या काळात वातावरण खुलल्यानंतर रब्बीच्या तयारीला प्रारंभ होईल.

शेतकरी पेरणीला प्रारंभ करतील. जिल्ह्यात रब्बी हंगामामध्ये सरासरी २ लाख २८ हजार २१४ हेक्टर क्षेत्र आहे. परंतु यंदा झालेल्या दमदार पावसाबरोबरच सर्वच मोठ्या, मध्यम आणि लघू प्रकल्पांमध्ये असलेल्या साठ्यामुळे सिंचनासाठी पाणी मिळणार आहे.

याचा फायदा घेत रब्बीचा पेऱ्यात वाढ होण्याचे संकेत आहेत. कृषी विभागाने तेराही तालुक्यात ३ लाख ५४ हजार ६०० हेक्टरवर रब्बीचा पेरा होईल, असे नियोजन केले आहे. रब्बी हंगामात शेतकऱ्यांचा जिल्ह्यात प्रामुख्याने हरभरा व मका पेरणीकडे मोठा कल असतो.

यंदा साडेतीन लाख हेक्टरपैकी ७१ टक्के क्षेत्रावर हरभऱ्याचा पेरा होण्याची शक्यता आहे. तर गव्हाचे क्षेत्र १६ टक्के, रब्बी ज्वारी आणि मका पीक ६ टक्के क्षेत्रावर घेतले जाण्याचा कृषी अंदाज आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Protest: शेतकरी कर्जमाफी, ओला दुष्काळ जाहीर करा

Crop Insurance Compensation: तातडीने विमा भरपाईसाठी कंपन्यांना निर्देश देऊ

APMC Pune: शेतीमाल प्रक्रिया मूल्यवर्धन प्रकल्प उभारणार

Heavy Rainfall: नैसर्गिक आपत्तीतून वाचलेल्या कपाशीची वाताहत

Cooperative Bank Award: उत्कृष्ट सहकारी संस्थांना सन्मानाची ढाल प्रदान

SCROLL FOR NEXT