Electricity Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Electricity : वीज कंपनीच्या नियोजनशून्य कारभारामुळे रब्बी हंगाम धोक्यात

Rabi Season : रब्बी हंगामात पिकांची लागवड करण्यात आली असून, वीजपुरवठा नियमित नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.

Team Agrowon

Washim News : रब्बी हंगामात पिकांची लागवड करण्यात आली असून, वीजपुरवठा नियमित नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. वीज कंपनीच्या नियोजनशून्य कारभारामुळे रब्बी हंगाम धोक्यात आल्याची ओरड शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

खरीप हंगामातील सोयाबीन पीक यंदा संपूर्णतः हातातून गेले. आता रब्बी हंगामातील पिकांवर शेतकरी अवलंबून आहे. महावितरणच्या योग्य कारभार अभावी रब्बी हंगामही हातातून जातो की काय असा प्रश्‍न रिसोड तालुक्यातील शेतकऱ्यांना पडला आहे.

कंपनीकडून कमी दाबाने वीजपुरवठा केला जात आहे. त्यामुळे कृषिपंप पुरेशा क्षमतेने चालत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन तातडीने विद्युत पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

महावितरण कंपनीने कुठल्याही प्रकारचे नियोजन न केल्यामुळे याचा त्रास आम्हा शेतकऱ्यांना होत आहे. त्यामुळे तातडीने याकडे लक्ष देऊन विद्युत पुरवठा सुरळीत करावा.
- प्रकाश उद्धव बाजड, कास्तकार, नावली, जि. वाशीम
रिसोड तालुक्यांमध्ये तातडीने योग्य त्या उपाययोजना करून शेतकऱ्यांना होणारा त्रास दूर करावा. जेणेकरून रब्बी हंगामातील पिकांना पाणी देणे सोईस्कर होईल.
- अमोल नरवाडे, रिसोड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT