Kharif Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Season In Crisis : अपेक्षित पावसाअभावी रब्बी हंगामावर संकटांचे ढग

Rabi Season : पाऊस न झाल्याने नदी पात्र कोरडी असून विहिरी अजून सांगळ्यावर चालल्या आहेत. यामुळे रब्बी हंगामात अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.

Team Agrowon

Satara : जिल्ह्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने खरीप हंगाम जवळपास वाया जाणार आहे. जिल्ह्यात ९९ पैकी ७२ मंडलांत पिकांचे ५० टक्के अधिक नुकसान झाले आहे. पाऊस न झाल्याने नदी पात्र कोरडी असून विहिरी अजून सांगळ्यावर चालल्या आहेत.

यामुळे रब्बी हंगामात अडचणींना सामोरे जावे लागणार असून अजूनही या हंगामातील कामे सुरू झालेली नाहीत. जिल्ह्यात कधी नव्हे तो पावसाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागला आहे. कधी तरी होणाऱ्या पावसाने पिके जगली असली तरी उत्पादन मात्र मिळणार नाही.

पंतप्रधान पीकविमा योजनेसाठी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यातील ९९ मंडलांपैकी ६३ मंडलांत सलग २१ दिवस पाऊस न झाल्याची नोंद असून नऊ मंडलांत शेवटच्या एक दोन दिवसांत पाऊस झाला आहे.

मात्र अपुऱ्या पावसामुळे पिकांचे ५० टक्के पेक्षा अधिक नुकसान झाल्याने नुकसानग्रस्त यादी या मंडलांचा समावेश करण्याची मागणी झाली आहे. यामुळे ७२ मंडलांत पाऊस न झाल्याने पिके जवळपास करपली असल्याचे स्पष्ट होत आहे.

पाऊस नसल्याने अजूनही मशागतीच्या कामांना गती आलेली नाही. माण, खटाव, फलटण, कोरेगाव, खंडाळा या दुष्काळी तालुक्यांचा रब्बी हंगाम प्रमुख असून याही तालुक्यात शेतकरी रब्बी हंगाम घेण्याबाबत पावसाअभावी अजूनही साशंक आहेत. पाऊस नसल्याने पिण्याचा प्रश्न अजूनही गंभीर असून ७८ गावे ३५३ वाडीवस्तीवर ८४ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. जिल्ह्यातील पर्जन्यमानात मोठी घट झाली आहे.

जिल्ह्यात सरासरीच्या पर्जन्यमानाच्या तुलनेत ६८.८ टक्के पर्जन्यमान झाले आहे. कोरेगाव तालुक्यात सर्वात कमी म्हणजे ५०.७ टक्के तर माण, फलटण, खंडाळा, महाबळेश्वर तालुक्यात ५५ टक्के  पाटण, कऱ्हाड, वाई तालुक्यात ७० टक्केच्या आत पाऊस झाला आहे.

पाऊस नसल्याने नद्या कोरड्या असून विहिरी, बोअरवेल सांगळ्यावर चालत आहे. उपलब्ध पाणी देऊन पिके जगवण्याची शेतकऱ्यांची कसरत सुरू आहे. या अपुऱ्या पावसामुळे रब्बी हंगामाची तयारी सुरू झालेली नाही. तसेच पशुधनासाठी चारा पिकास प्राधान्य दिले जाणार आहे.

कृषी विभागाने रब्बीची तयारी सुरू केली असून ३२ हजार क्विंटल बियाणे व एक लाख ४५ हजार ५०० टन रासायनिक खतांची मागणी करण्यात आली आहे. तसेच खरीप हंगामातील ६० हजार ८५० टन खते उपलब्ध आहेत. पाणी टंचाई आतापासूनच सुरू झाली असल्याने धरणातील आवर्तने सुरू केली आहे.

पाऊस नसल्याने खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात पाऊस होईल अशी आशा होती. मात्र अजूनही पाऊस नसल्यामुळे रब्बी हंगामातील कामे ठप्प आहेत. सध्या पाण्याची अत्यंत बिकट परिस्थिती आहे.
- संजय महाजन, प्रगतिशील शेतकरी, पिपोंडे ब्रु., ता. कोरेगाव, जि. सातारा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Crop Loan: रब्बी पीककर्ज वितरण संथ गतीने

Mushroom Processing: अळिंबीचे २४ नवे प्रकल्प

Soil Health: मराठवाड्यातील जमिनीमध्ये नत्र, स्फुरद अन्नद्रव्यांची कमतरता

Maize MSP: हमीभावाने मका खरेदी सुरू

Weather Update: चार दिवस थंडी कमी राहणार

SCROLL FOR NEXT