Wheat Harvesting
Wheat HarvestingAgrowon

Rabi Crop Harvesting : वादळी पावसामुळे रब्बी पिकांच्या काढणीला वेग

गेल्या चार ते पाच दिवसांपासून राज्यात विविध ठिकाणी जोरदार वादळी पाऊस होत आहे. या पावसामुळे रब्बी पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले.
Published on

Pune News गेल्या चार ते पाच दिवसांपासून राज्यात विविध ठिकाणी जोरदार वादळी पाऊस होत आहे. या पावसामुळे रब्बी पिकांसह (Rabi Crop) फळबागांचे (Orchard Crop Damage) मोठे नुकसान झाले. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकरी चिंतेत असून नुकसान नको या उद्देशाने काढणीला आलेल्या गहू, हरभरा पिकांची काढणी (Rabi Crop Harvesting) वेगात सुरू केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ सुरू झाली आहे.

हवामान विभागाने गेल्या गेल्या आठवड्यात राज्यातील विविध ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज दिला होता. त्यानंतर मागील तीन ते चार दिवसांपासून पुणे विभागात काही प्रमाणात ढगाळ वातावरण तयार होत आहे. या ढगाळ हवामानाचा शेतातील विविध पिकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे.

Wheat Harvesting
Rabi Crop Harvesting : पाच जिल्ह्यांत तूर काढणी पुर्ण, तर कापसाची वेचणीही आटोपली

येत्या काळात जिल्ह्यात जास्त पाऊस झाल्यास मोठे नुकसान होण्याच्या भीतीने शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत. जिल्ह्यातही आंबेगाव, बारामती, हवेली, दौंड, पुरंदर अशा काही तालुक्यांत पाऊस हजेरी लावत आहे.

सध्या विभागात अनेक भागात कधी ऊन, तर कधी ढगाळ हवामान, तर थंडी यामुळे गहू, कांदा पिकांना फटका बसत आहे. त्यातच वाढीच्या अवस्थेत असलेल्या कलिंगड, काकडी व भाजीपाला पिकांवरही रोग, किडीचा प्रादुर्भावाची शक्यता आहे. गेल्या महिन्यातही पावसामुळे पिके शेतकऱ्यांच्या हातून गेली आहे.

ढगाळ हवामानामुळे जोमात आलेल्या पिकांवर रोग, किडीनी आक्रमण केले आहे. सततचे बदलत्या हवामानामुळे पिकांवर रोग किडीचा प्रादुर्भाव वाढत असून फवारणीच्या खर्चात वाढ होऊ लागली आहे. त्यातच दोन दिवसापासून ढगाळ हवामानाचा परिणाम पिकांवर होत आहे.

Wheat Harvesting
Rabi Crop Harvesting : रब्बीतील पिकांच्या काढणीचा जोर वाढला

सध्या हरभरा, गव्हाची काढणी वेगाने सुरू असली तरी त्याला मजुर टंचाईचा मोठा फटका बसत आहे. त्यावर पर्याय म्हणून बहुतांशी शेतकरी यांत्रिकीकरणाद्वारे थेट काढणी करण्यास प्राधान्य देऊ लागला आहे.

विभागातील अनेक भागात गहू, हरभरा काढणीसाठी यंत्राचा (हार्वेस्टर) अवलंब करत असून त्यासाठी शेतकऱ्यांना एकरी दोन ते तीन हजार रुपये मोजावे लागत आहे.

काही ठिकाणी तीन हजारांहून अधिक दर देऊन शेतकऱ्यांना पिकांची काढणी करावी लागत असल्याचे चित्र आहे.

सध्या द्राक्षे काढणी अंतिम टप्यांत आली आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांपूर्वी तालुक्यात विविध ठिकाणी पाऊस झाला. या पावसामुळे तुरळक ठिकाणी द्राक्षासह, टोमॅटो, गहू, हरभरा अशा काही पिकांचे नुकसान झाले. गेल्या महिन्यातही चांगलेच नुकसान झाले होते. त्याची नुकसान भरपाई अद्याप मिळालेली नसल्याने पुन्हा अस्मानी संकट शेतकऱ्यांपुढे उभे राहिले आहे.
- जितेंद्र बिडवाई, अध्यक्ष, जुन्नर तालुका द्राक्षे उत्पादक संघ, जुन्नर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com