Rabi Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Sowing : छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन लाख हेक्टरवर रब्बी पिके

Rabi Season : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नऊ तालुक्यात सर्वसाधारण एक लाख ९० हजार ९३५ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत प्रत्यक्ष यंदा २ लाख १९ हजार २०४ हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नऊ तालुक्यात सर्वसाधारण एक लाख ९० हजार ९३५ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत प्रत्यक्ष यंदा २ लाख १९ हजार २०४ हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली. पेरणी झालेली पिकं कुठे काढणीच्या तर कुठे पक्वतेच्या अंतिम टप्प्यात आहेत.

काही तालुक्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने या रब्बी पिकांना दणका देण्याचे काम केले आहे.यंदा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र एक लाख ९० हजार ९३५ हेक्टर होते. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील २३ हजार ३४८, पैठणमधील २८ हजार ५५४, फुलंब्रीतील १४ हजार ३१४,

वैजापूरमधील १९ हजार ८७३, गंगापूर मधील २५ हजार ०२३, खुलताबाद मधील १२ हजार ४२८, सिल्लोड मधील ३७ हजार ७१३, कन्नडमधील २४ हजार १२१, तर सोयगावमधील ५५६१ सरासरी क्षेत्राचा समावेश आहे. त्या तुलनेत प्रत्यक्षात २ लाख १९ हजार २०४ हेक्टर म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ११४ टक्के क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली.

पेरणी झालेल्या क्षेत्रामध्ये रब्बी ज्वारीच्या ३९ हजार ५९ हेक्टर, गव्हाचे ६८ हजार ७८५ हेक्टर मक्का ३४ हजार ८४७ हेक्टर इतर तृणधान्य ३८९९ फक्त हरभरा ७१ हजार ३३ हेक्टर इतर कडधान्य ३९ हेक्टर करडई ६६१ जवस आठ हेक्टर सूर्यफूल ५९९ हेक्टर इतर गळीत धान्य २७५ हेक्टर पेरणी झालेल्या क्षेत्राचा समावेश आहे. सर्वांत कमी पेरणी पैठण तालुक्यात तर सर्वांत जास्त पेरणी कन्नड तालुक्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत दुपटीपेक्षा जास्त झाली होती.

तालुकानिहाय रब्बी पीक क्षेत्र (हेक्टरमध्ये)

तालुका पीक क्षेत्र

छत्रपती संभाजीनगर १७ हजार ५५९

पैठण १७ हजार ६६८

फुलंब्री १३ हजार १५०

वैजापूर २८ हजार ८०१

गंगापूर २५ हजार ६५५

खुलताबाद १३ हजार ६६५

सिल्लोड ३९ हजार ९८१

कन्नड ५३ हजार १४९

सोयगाव ९ हजार ५७६

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solar Pump Complaint : आता महावितरणच्या अॅपवर शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाची तक्रार करता येणार

Monsoon Rain: शनिवारपासून पावसाचा जोर वाढणार; कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज कायम

Rain Crop Damage : मॉन्सूनपूर्व पावसामुळे पिके, फळबागांचे २१ कोटींचे नुकसान

Irrigation Management : शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोेचले तरच प्रकल्पांचा उपयोग

Water Storage Marathwada : मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा ७९ टीएमसीवर

SCROLL FOR NEXT