Rabi Crop loan Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Crop Loan : रब्बी पीक कर्ज प्रस्ताव वाढू लागले

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात रब्बी हंगामात केळी व इतर पिकांसाठी पीक कर्ज प्रस्ताव बँकांकडे दाखल होत आहेत. सुमारे पाच हजार प्रस्ताव सादर झाले असून, किमान ७०० कोटी रुपये निधीची गरज त्यासाठी असणार आहे.

खानदेशात फक्त ६०० कोटी रुपये निधी वितरण रब्बी पीक कर्जासंबंधी करण्याचे नियोजन बँका, प्रशासनाने केले आहे. अशात आणखी १०० कोटी रुपये निधीची व्यवस्था, तरतूद पीक कर्जासाठी करावी लागेल, असाही मुद्दा आहे. खरिपात खानदेशात सुमारे २८०० कोटी रुपये निधीची आवश्यकता असते. या तुलनेत रब्बीमध्ये पीक कर्जाची कमी मागणी असते.

याबाबत मध्यंतरी प्रशासनाने नियोजन केले होते. त्यात मागणी व निधी यावर चर्चा झाली होती. मागील एप्रिल, मे महिन्यात अनेक शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळू शकले नाही. जूनपासून कर्ज प्रस्ताव मार्गी लावण्याचे काम वेगात सुरू झाले. या प्रस्तावांसाठी कागदपत्रांची जुळवाजुळव अनेकांना शक्य झाली नाही.

यामुळे अनेक वंचित शेतकरी आता रब्बीमध्ये पीक कर्ज मागणी करीत आहेत. हे प्रस्ताव यंदा वाढतील, असे संकेत सुरवातीलाच होते. जळगाव जिल्ह्यात सुमारे साडेतीन हजार शेतकऱ्यांचे पीक कर्ज प्रस्ताव राष्ट्रीयीकृत, खासगी व सहकारी बँकांकडे दाखल झाले आहेत. हे प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्याची गरज आहे. कारण शेतकऱ्यांना निधीची गरज आहे.

केळी व इतर पिकांसाठी पुढे खते, मजुरी आदी खर्च लागणार आहे. खरिपात पिकांची हानी झाल्याने निधीची अधिकची गरज शेतकऱ्यांना आहे. रब्बी हंगाम अर्धा संपला आहे. आता पिकांचे व्यवस्थापन व इतर कार्यवाहीसाठीदेखील निधीची गरज आहे.

सिबीलसाठी निधीची कपात

राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये अधिकचे कर्ज प्रस्ताव दाखल झाले आहेत. त्यात सिबीलची कटकटही शेतकऱ्यांसमोर उभी केली जात आहे. यामुळे अधिकची अडचण होत आहे. त्यात जामिनदार, कर्जदार यांचे कर्ज परतफेडीचे रेकॉर्ड तपासले जात आहे. यासाठी बँका १०० रुपये शुल्क सिबिल तपासणीबाबत घेत आहेत. हा हकनाक भुर्दंड शेतकऱ्यांना बसत असून, हे तपासणी शुल्क बंद करावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

धुळे नंदुरबार जिल्हा बँकेला कर्ज वितरणाचा लक्ष्यांक नाही

धुळे - नंदुरबार जिल्हा बँकेला रब्बीसाठी पीक कर्ज वितरणाचा लक्ष्यांकच नाही. ही बँक ग्रामीण भागात आहे. परंतु बँकेला शासनाकडून मदत, आधार नाही. बँकेकडून खरिपात पीक कर्ज वितरणासंबंधी गतीने काम सुरू होत. परंतु रब्बीसाठी बँकेला लक्ष्यांक नाही. यामुळे बँक वित्तीयदृष्ट्या सक्षम करण्याचा मुद्दाही शेतकरी उपस्थित करीत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MSP Procurement Center : मका, सोयाबीन किमान आधारभूत खरेदी केंद्रे सुरू करावीत

Rabi Season 2024 : शेतात गाळ, माती, शेणखत टाकण्यास वेग

Solapur DPDC Meeting : ‘जिल्हा वार्षिक’मधील कामांची निविदा प्रक्रिया त्वरित राबवा

Grape Farming : ग्राहक मागणीभिमुख द्राक्ष उत्पादन, विपणन काळाची गरज

Kasuri Methi Market: जास्त उत्पादन देणारी कसुरी मेथीची शेती कशी कराल ?

SCROLL FOR NEXT