
Yavatmal News : शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपात राष्ट्रीय बँका नेहमीच आखडता हात ठेवत आल्या आहेत. खरीप हंगामातही राष्ट्रीय बँका पीककर्ज वाटपात मागे आहेत. रब्बी हंगामातही चारशे कोटी रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट असताना केवळ १४० कोटी रुपयांच्याच पीककर्जाचे वाटप केले आहे.
खरीप व रब्बी हे दोन्ही हंगाम शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आहेत. जिल्ह्यात खरिपातील लागवड क्षेत्र मोठे आहे. खरिपावर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची भिस्त असते. यंदा खरीप हंगामाने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली. त्यामुळे सिंचनाची सोय असलेले शेतकरी खरिपानंतर रब्बीमध्ये गहू, हरभरा, भाजीपाला आदी पिकांची लागवड करतात. सध्या रब्बी हंगामाच्या पेरणीची लगबग सुरू आहे.
रब्बी हंगामात शेतकऱ्यांना चारशे कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. आतापर्यंत केवळ १३९ कोटी पाच लाखांचे कर्ज शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले. अद्याप अनेक शेतकरी रब्बी हंगामाच्या कर्जासाठी बँकांचे उंबरठे झिजवित आहेत.
बहुतांश शेतकऱ्यांनी हरभरा पिकाची लागवड केली असून, गव्हाच्या पेरणीला सुरुवात झाली आहे. बँकांकडून पीककर्ज मिळत नसल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांची पेरणीसाठी जुळवाजुळव करताना कसरत होत आहे. जिल्हा प्रशासनाकडून राष्ट्रीय आणि जिल्हा बँकेला कर्ज वाटपाचे उद्दीष्ट देऊन वितरणाच्या सूचना केल्या. डिसेंबर अर्धा झाला आला आहे. अजूनही बँकांचे कर्जवाटप झालेले नाही.
खरीप हातातून गेला
खरीप हंगमातील सोयाबीन, कापूस पिकाला बाजारपेठेत भाव नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अशात शेतकऱ्यांची भिस्त रब्बी हंगामावर आहे. यामुळे शेतकरी रब्बीसाठी तयारी करीत आहेत. मात्र, बदललेले हवामान पाहता शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेल्याने रब्बीवरच शेतकऱ्यांची भीस्त आहे.
वीज पुरवठ्याचा प्रश्न
पिकांना जगविण्यासाठी पाण्यासोबतच वीजपुरवठादेखील महत्त्वाचा आहे. वीज वितरणकडून भारनियमन तसेच वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. शासनाने शेतकऱ्यांना सिंचनासाठी वीज दिवसा द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.