Foggy Weather Agrowon
ॲग्रो विशेष

Foggy Weather : पिकांवर दाट धुके; शेतकरी पुन्हा चिंतेत

Team Agrowon

Solapur News : जिल्ह्यात गुरुवारी दिवसभर थंड हवामानासह भरून आलेले मळभ आणि त्यापाठोपाठ दाट धुक्यासह उगवलेली शुक्रवारची सकाळ यामुळे शेतातील उभी पिके पुन्हा एकदा धोक्यात आली आहेत. दिवसागणिक बदलणाऱ्या वातावरणामुळे शेतकऱ्यांची अवस्था बुडत्याचा पाय खोलात, अशी झाली आहे.

अगोदरच दुष्काळी परिस्थितीमुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला. त्यातून कसाबसा तो सावरत असतानाच गुरुवारी (ता. ७) दिवसभर राहिलेल्या ढगाळ वातावरणात सूर्यदर्शन तर झालेच नाही पण थंड हवेची लहरही दिवसभर होती. त्यामुळे यावर्षी प्रथमच अख्खा दिवस स्वेटर-मफलरसारख्या उबदार कपड्यात घालवावा लागला.

या रोगट वातावरणात पिके कशी तग धरणार? या विवंचनेत रात्र घालविलेल्या शेतकऱ्यांची शुक्रवारची सकाळही चिंता वाढवणारे दाट धुके घेऊनच उगवली. हे धुके इतके दाट होते की अगदी पंधरा-वीस फुटावरीलही झाडे-झुडपे धुक्यात हरवून गेली होती.

सकाळी नऊपर्यंत राहिलेल्या या धुक्यामुळे फ्लावरिंगमध्ये असणाऱ्या द्राक्षबागांना जास्त फटका बसणार असून मणीगळ व फळकुज होण्याचा धोका आहे. शिवाय भुरी, करपा, डाऊनी या रोगांचाही प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे.

डाळिंबावर तेलकट डाग, कुजवा तर कांदा पिकावर करपा आणि ज्वारीवर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकामागून एक संकटांचा सामना करावा लागणारा शेतकरी वर्ग त्रासून गेला आहे.

सध्या वातावरणात अचानक होणारे बदल हे ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम आहेत. भविष्यात अजून यापेक्षा जास्त संकटांचा आपणास सामना करावा लागेल. आज पडलेल्या धुक्यामुळे सर्वच पिके प्रभावित होणार असून सदर धुके जास्त काळ राहिल्यास पिकांचे अवकाळी पावसापेक्षा जास्त नुकसान होऊ शकते.
— महेश व्यवहारे, प्रगतिशील शेतकरी, करकंब, ता. पंढरपूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Serious Issues of Rape : लैंगिकतेचे शमन की दमन?

Value Chain Development Plan : कंत्राटदार साखळी विकास योजना

Mahaagromart E-Portal : ‘महाॲग्रोमार्ट’ला स्कॉच पुरस्कार

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

SCROLL FOR NEXT