Chhatrapati Sambhajinagar News: मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर व जालना या दोन मका उत्पादक जिल्ह्यांत अद्यापही मका खरेदीसाठी नोंदणी व खरेदी केंद्रे सुरू होण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. दुसरीकडे आधारभूत किमतीपेक्षा एक हजाराहून कमी दराने मका खरेदी केला जात असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे..गेल्या वर्षी शासनाने आधारभूत किमतीने मका खरेदीसाठी २२२५ रुपये प्रतिक्विंटल दर निश्चित केला होता. यंदा २४०० रुपये प्रतिक्विंटल दर निश्चित केला आहे. जालना जिल्ह्यात पाच मका खरेदी केंद्रे सुरू करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. त्यामध्ये अंबड, मंठा, बदनापूर, राजूर, माहोरा-जाफराबाद या केंद्रांचा समावेश आहे..Maize Procurement: मका खरेदी केंद्राअभावी कर्नाटकातील शेतकऱ्यांना फटका, व्यापाऱ्यांकडून भाव पाडून खरेदी, क्विंटलमागे ८०० रुपयांचे नुकसान.परंतु, अद्यापही खरेदी केंद्रे सुरू होण्याची प्रक्रिया सुरू आहे. परवानगी दिलेल्या या केंद्रांवर बायोमेट्रिक पद्धतीने शेतकऱ्यांची नोंदणी केली जाणार असल्याने मशिन मागविण्यात आल्या आहेत. मशिन आल्यानंतर प्रत्यक्षात नोंदणीला आणि नंतर खरेदीला सुरुवात होईल, अशी माहिती मार्केटिंग फेडरेशनचे जालना जिल्हा पणन अधिकारी राजेश हेमके यांनी दिली..छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खरेदी-विक्री संघाच्या ११ व नव्याने प्रस्तावित करण्यात आलेल्या ९ केंद्रांना जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. जुन्या ११ केंद्रांमध्ये करमाड, कन्नड, गंगापूर, लासूर स्टेशन, सिल्लोड, सोयगाव, खुलताबाद, वैजापूर, फुलंब्री, पाचोड व शिवना या जुन्या केंद्रांचा समावेश आहे..Maize Procurement: मका खरेदीसाठी केंद्रांवर नोंदणी सुरू.या केंद्रांचा डेटा उपलब्ध असल्याने ती केंद्रे आयडीसाठी वरिष्ठ पातळीवर पाठवण्यात आली आहेत. एक-दोन दिवसांत ती प्रक्रिया पूर्ण होऊन केंद्रांवर प्रत्यक्ष नोंदणी सुरू केली जाईल. इतर प्रस्तावित नव्या केंद्रांसाठी आवश्यक माहिती मागविण्यात आली असून लवकरच त्या केंद्रांवरही नोंदणी व खरेदीची प्रक्रिया सुरू होण्यासाठी पावले उचलली जातील, असे मार्केटिंग फेडरेशनचे छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा पणन अधिकारी विजय राठोड यांनी स्पष्ट केले..केंद्रे तत्काळ सुरू करण्याची मागणीबाजारात ११०० रुपयांपासून १६०० रुपयांपर्यंत प्रति क्विंटल दर मक्याला मिळत असल्याची स्थिती आहे. ज्या ठिकाणी अत्यंत कमी आवक आहे, त्या ठिकाणी अपवादात्मक स्थितीत मक्याला थोडा अधिक दर मिळत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे मका उत्पादकांना बसणारा फटका लक्षात घेता आधारभूत किमतीने खरेदी केंद्रे तत्काळ सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून जोर धरत आहे..अद्यापपर्यंत मका विक्रीचे दर १२०० ते १६०० च्या पुढे सरकायला तयार नाहीत. आधारभूत किमतीपेक्षा प्रति क्विंटलमागे १००० रुपयांपर्यंतचा फटका मका उत्पादकांना सोसावा लागत आहे.शांतिलाल पवार, मका उत्पादक, वैजापूर ग्रामीण.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.