Livestock Market Agrowon
ॲग्रो विशेष

Livestock Market : बुलडाणा जिल्ह्यात जनावरांच्या खरेदी-विक्रीवर बहिष्कार

Beef Ban Protest : या बंद दरम्यान कोणत्याही जनावरांची खरेदी किंवा कत्तल केली जाणार नाही. शेतकरी, चामडा कामगार आणि हाड उद्योग कारागीर मुस्लिमसह मांस खाणारे इतर जाती-धर्माचे लोकांची उपजीविका त्यांच्यावर अवलंबून आहे.

Team Agrowon

Buldana News : राज्यात कथित गोमांस बंदीच्या नावाखाली खाटीक व मुस्लिम समाजावर अन्याय होत असल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील जनावरांच्या खरेदी व विक्रीवर बहिष्कार टाकून सर्व खाटीक समाजाने अनिश्चित काळासाठी जनावरे खरेदी व कोणत्याही जनावरांची कत्तल न करण्याच्या निर्णय घेतला आहे. यासंदर्भात उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की या बंद दरम्यान कोणत्याही जनावरांची खरेदी किंवा कत्तल केली जाणार नाही. शेतकरी, चामडा कामगार आणि हाड उद्योग कारागीर मुस्लिमसह मांस खाणारे इतर जाती-धर्माचे लोकांची उपजीविका त्यांच्यावर अवलंबून आहे. मात्र, खाटीक समुदायाला लक्ष केले जात आहे.

त्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र जनावरे खरेदी व मांस व्यवसाय बंद ठेवण्याच्या निर्णय घेण्यात आला. काही गावगुंड आणि पोलिसाकडून जनावरे विकत घेणाऱ्या खाटीक समाजाच्या व्यापाऱ्यांवर होत असलेले अन्याय आणि छापे मारून त्यांची पैशाची लूट केली जाते.

त्यांच्यावर गुन्हे दाखल करून व्यापाऱ्यांना अमानुषपणे मारहाण केली जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे. शासनाने तत्काळ याकडे लक्ष देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली.

निवेदन देताना मोहम्मद अफसर कुरेशी, अजिस कुरेशी, जब्बार कुरेशी, मोजिब हसन कुरैशी, अफसर चौधरी, फारूक कुरेशी, तोफिक कुरेशी, खालिक कुरेशी यांच्यासह अनेक खाटीक समाजातील नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Farming: भात पीक खरंच हवामान बदलाच्या संकटाला कारणीभूत ठरतंय का?

Onion Crisis: एकरी लाखाचा खर्च; हातात ६३ हजार

Maize Farming: मका पिकात आंतरपिके घेतल्यास मिळेल नफा

Krishi Kumbh 2026: ‘कृषी कुंभ- २०२६’मध्ये शेतकऱ्यांचा होणार सन्मान

Takari Irrigation Scheme: ‘ताकारी’च्या बंदिस्त वाहिनीचे काम अपूर्ण

SCROLL FOR NEXT