Cotton Market Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Market : सरकारच्या आदेशाला व्यापारांकडून केराची टोपली; हमीभावापेक्षाही कमी भावाने कापूसाची खरेदी

Cotton Guaranteed Price : सध्या राज्यातील शेतकऱ्याला कोणत्याच शेतपिकाला दर मिळत नसल्याचे चित्र आहे. कापसाला योग्य हमीभाव मिळावा यासाठी शासनाने कापसाचे हमीभाव ठरवून दिले आहेत. मात्र या आदेशाला व्यापाऱ्यांनी हरताळ फासला आहे.

Aslam Abdul Shanedivan

Wardha News : गेल्या काही दिवसापासून राज्यातील शेतकरी पिकाचे दर पडण्याच्या कारणाने त्रस्त झाला आहे. दरम्यान कापसाला कमी भाव मिळत असल्याने तो पुन्हा संकटात सापडला आहे. वर्ध्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांची लूट व्यापारी करत असल्याचे आता समोर आले आहे. व्यापाऱ्यांकडून शासनाने कापसाचे हमीभाव ठरवून दिले असतानाही हमीभावापेक्षाही कमी दरात कापूस खरेदी केला जात आहे. येथे व्यापाऱ्यांकडून तब्बल पाचशे ते सातशे रुपयांच्या तुटीवर कापूस खरेदी केला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

यंदा कापसाला भाव मिळत नसल्याने शासनाने हमीभाव ठरवून दिले. मात्र वर्ध्यातील देवळी कृषी उत्पन्न समितीत याच्या उलट कारभार समोर आला आहे. येथील व्यापाऱ्यांकडून सरकारच्या या निर्णयाला केराची टोपली दाखवली गेली आहे. येथील व्यापाऱ्यांनी तब्बल पाचशे ते सातशे रुपयांच्या तुटीवर कापूस खरेदी केला आहे.

तसेच सरकारच्या हमीभावापेक्षा अधिक तूटीने कापूस खरेदी केल्याने शेतकरी आणि व्यापारी यांच्यात शाब्दिक वाद उफाळला. यामुळे काही काळ लिलाव बंद राहिले होते. तर यावर व्यापाऱ्यांनी अवाक जास्त झाल्याचे कारण सांगितले आहे.

बाजार समिती बंद

दरम्यान देवळी येथील कृषी उत्पन्न समिती शाब्दिक वादानंतर आता दोन दिवस बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला आहे. तसेच हमीभावत खरेदी न केल्यास गुन्हे दाखल करण्याच्या शासनाच्या भूमिकेला देखील व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे.

आवक वाढली

देवळी येथील कृषी उत्पन्न समितीत आवक वाढल्याने माल ठेवायला जागा नाही असेही कारण व्यापाऱ्यांनी दिले आहे. तसेच त्यांनी दोन दिवस बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र बाजार समिती बंद ठेवण्याचे नेमके कारण हे शासनाचा इशारा असून त्याला व्यापाऱ्यांचा विरोध असल्याचे बोलले जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Rain: पुढील ५ दिवस पाऊस कमी; पूर्व विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज

Crop Damage Compensation : तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्या ः पालकमंत्री पाटील

Solar Project : सौर ऊर्जेमुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज

Beed Rainfall : बीडमध्ये समाधानकारक पाऊस नाही

Godavari River Basin : गोदावरी खोरे मोठे, मात्र तुटीचे खोरे

SCROLL FOR NEXT