Soybean Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Procurement : हमीभावाने २ हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी

Soybean Market : केंद्र शासनाने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किंमत दराने (प्रतिक्विंटल ४८९२ रुपये) परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ६ केंद्रांवर गुरुवारपर्यंत (ता. ३१) १६१ शेतकऱ्यांचे २ हजार ४६३.४८ क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले.

Team Agrowon

Parbhani News : केंद्र शासनाने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किंमत दराने (प्रतिक्विंटल ४८९२ रुपये) परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ६ केंद्रांवर गुरुवारपर्यंत (ता. ३१) १६१ शेतकऱ्यांचे २ हजार ४६३.४८ क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले. या दोन जिल्ह्यातील १८ खरेदी केंद्रांवर हमीभावाने सोयाबीन विक्रीसाठी ९ हजार ९२५ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. शेतकरी नोंदणीसाठी शुक्रवारपर्यंत (ता. १५) मुदतवाढ देण्यात आली, अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी कुंडलिक शेवाळे यांनी दिली.

किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यात राज्य सहकरी पणन महासंघ व केंद्रीय नोडल एजन्सी राष्ट्रीय कृषी सहकारी पणन महासंघ (नाफेड) यांच्यातर्फे सोयाबीन खरेदीसाठी १ ऑक्टोबरपासून शेतकरी नोंदणी तर १५ ऑक्टोबरपासून सोयाबीन खरेदी सुरू झाली. परभणी, पेडगाव, जिंतूर, बोरी, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, पूर्णा या ९ ठिकाणी खरेदी केंद्रे आहेत.

या केंद्रांवर गुरुवारअखेर (ता. २४) ६ हजार १९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी परभणी, बोरी, मानवत, पाथरी, पूर्णा येथील खरेदी केंद्रांवर नोंदणीकृत ४८५ शेतकऱ्यांना एसएमएस पाठविण्यात आले. परभणी आणि पूर्णा या दोन खरेदी केंद्रांवर ४८ शेतकऱ्यांचे ७५४.४८ क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले.

हिंगोलीत हिंगोली, कन्हेरगाव, कळमनुरी, वारंगा, वसमत, जवळा बाजार, येळेगाव, सेनगाव, साखरा या ९ खरेदी केंद्रांवर गुरुवारपर्यंत (ता. ३१) ३९०६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी ९९६ जणांना एसएमएस पाठविण्यात आले. ४ केंद्रांवर ११३ शेतकऱ्यांचे १७०९ क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले.

परभणी-हिंगोली जिल्हे हमीभाव सोयाबीन खरेदी स्थिती (क्विंटलमध्ये)

केंद्र ठिकाण शेतकरी नोंदणी सोयाबीन खरेदी शेतकरी संख्या

परभणी २७३ ३९५.९८ २४

पेडगाव १२७ ०० ००

जिंतूर ४६४ ०० ००

बोरी ४६९ ०० ००

सेलू १४२५ ०० ००

मानवत ९९३ ०० ००

पाथरी ७२७ ०० ००

सोनपेठ ७५७ ०० ००

पूर्णा ७८४ ३५८ २४

हिंगोली २६३ ०० ००

कन्हेरगाव ५७८ ०० ००

कळमनुरी ५३४ ४८७.५० ३४

वारंगा ५३० ५७८ ३९

वसमत ६७३ ५०९.५० ३३

जवळा बाजार ८५५ १३४ ७

येळेगाव २२७ ०० ००

सेनगाव ८२ ०० ००

साखरा २६३ ०० ००

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mushroom Benefits : आरोग्यदायी अळिंबी

Leafy Vegetables Kolhapur : कोल्हापूर बाजार समितीत कोथिंबीरची आवक वाढली; लसूण दरात वाढ

Crop Pattern : व्यावसायिक पीकबदलातून चितळवेढेत समृद्धी

Gram Panchayat Administration : लोकाभिमुख असावे ग्रामपंचायतीचे नियोजन...

Medicinal Plants : औषधी वनस्पती विकासातील खोडे काढा

SCROLL FOR NEXT