Pune APMC Agrowon
ॲग्रो विशेष

Pune APMC: पुणे बाजार समितीत चार दिवसांतच ठेका बदलाची गतिमान प्रक्रिया

Tender Controversy: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अवघ्या चार दिवसांत ठेका बदलण्याची प्रक्रिया राबविण्यात आली आहे. मार्गदर्शक सूचनांना डावलून ठराविक व्यक्तीस काम देण्याचा प्रकार समोर येत असून, हा ठेका दरवर्षी कोटी रुपयांच्या घरात जाण्याची शक्यता आहे.

गणेश कोरे

Pune News: ‘लालफिती’चा कारभाराचा अनेकांनी अनुभव घेतला आहे. मात्र, पुणे बाजार समितीची सेवा एवढी तत्काळ झाली आहे, कि अवघ्या चार दिवसांत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांना डावलून एका संचालकाच्या मर्जीतील अननुभवी व्यक्तीला शेतीमालाच्या संगणकीय आवक नोंदीचा ठेका देण्याची कार्यतत्परता दाखविली जात असल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित संचालक सरकारमधील बलाढ्य पक्षाशी संबंधित असल्याने या प्रक्रियेस गती मिळाल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, या ठेक्याबाबत पणन संचालक आणि जिल्हा उपनिबंधकांनी मार्गदर्शक सूचनांना बाजार समितीने केराची टोपली दाखविली आहे.पुणे बाजार समितीमध्ये २०१५ पासून शेतमालाची बाजार समितीच्या प्रवेशद्वारावरच करण्यासाठी स्टर्लिंग सिस्टिम्स कंपनी कार्यरत होती. या कंपनीचा ठेका रद्द करत, एका संचालकांच्या अननुभवी व्यक्तीस ठेका देण्याचा घाट घालण्यात आला होता

यासाठी संबंधित संचालकांच्या कार्यकर्त्याने १ मार्च २०२५ रोजी अर्ज करत, संबंधित कामाचा ठेका आम्हाला मिळावा, अशी मागणी केली. यामागणीवर प्रशासनाने तातडीने अवघ्या तीन दिवसांत ४ मार्च २०२५ रोजी कार्यालयीन टिपणी ठेवली. या टिपणीमध्ये संगणकीय आवक नोंद आणि ई नाम कामकाजाबाबत आवश्‍यक मनुष्यबळ पुरवठा करण्याबाबतची टिपणी संचालक मंडळ सभेसमोर २८ डिसेंबर २०२४ रोजी ठेवण्यात आली होती. यावर संचालक मंडळाच्या सभेमध्ये सदर कामाची तातडीने ई निविदा प्रक्रिया राबविण्यात यावी. तोपर्यंत सध्या आहे. त्याच ठेकेदाराकडून त्याच दरात काम करून घेण्यात यावे असा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, मे. स्पिन्‍डल वर्ल्ड यांनी संगणकीय आवक नोंद करण्यासाचा ठेका मिळविण्याबाबत मागणीचे पत्र दिले. यावर स्टर्लिंग सिस्टिम्स यांनी पणन संचालकांकडे दाद मागितली. पणन संचालक आणि जिल्हा उपनिबंधकांनी बाजार समितीला पत्र पाठवून संबंधित ठेका देण्यासाठी ई टेंडर प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले. या आदेशाला बाजार समितीने केराची टोपली दाखवत कार्योत्तर मंजुरीचा शेरा मारण्यात आला आहे. याबाबत आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

वार्षिक एक कोटींचा ठेका?

संगणकीय आवक नोंदीसाठी चार विविध विभागांत तीन शिफ्टमध्ये एजन्सीचे ६० कर्मचारी कार्यरत असतात. त्यासाठी प्रत्येकी २० ते २५ हजार रुपयांचे वेतन दिले जाते. यासाठी बाजार समिती सुमारे १२ ते १४ लाख रुपये संबंधित एजन्सीला देत असल्याचे समजते. याचा वार्षिक ठेका किमान एक ते दिड कोटी रुपयांच्या जवळपास जाण्याची शक्यता प्रशासनाने वर्तविली आहे. या एक कोटींच्या ठेक्यावर संबंधितांची नजर असल्याची चर्चा बाजार आवारात आहे.

शेतीमालाच्या संगणकीय आवक नोंदीचे स्टर्लिंगचा ठेका रद्द करण्यात आला असून, पुढील काम देण्याबाबत उपसमितीची बैठक झाली असून, मुख्य समितीमध्ये या कामकाजाच्या अटी-शर्ती अंतिम करून, ई टेंडर प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. सद्यःस्थितीत बाजार समितीचे कर्मचारी संगणकीय आवक नोंदीचे काम करीत आहेत.
राजाराम धोंडकर सचिव, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Injustice: शेतकरी नावडे सर्वांना

Illegal Agri Inputs: अवैधतेचे गुजरात मॉडेल

Vidarbha Irrigation Project: विदर्भातील १३ सिंचन प्रकल्प रद्द

Land Acquisition Law: भूसंपादन कायद्यातील बदलाबाबत सरकार गंभीर

BG II Cotton: ‘वनामकृवि’ कडून कपाशीचे सरळ वाण बीजी II मध्ये परिवर्तित

SCROLL FOR NEXT