Badalta Gramin Maharashtra Book : Agrowon
ॲग्रो विशेष

Shekhar Gaikwad : ‘बदलता ग्रामीण महाराष्ट्र’ पुस्तकाचे प्रकाशन

Badalta Gramin Maharashtra Book : ग्रामीण भागात होत असलेल्या बदलांविषयी ‘यशदा’चे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड लिखित ‘बदलता ग्रामीण महाराष्ट्र’ पुस्तकाचे प्रकाशन बुधवारी (ता. २६) पुणे येथे झाले.

Team Agrowon

Shekhar Gaikwad Book Publication : ग्रामीण भागात होत असलेल्या बदलांविषयी ‘यशदा’चे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड लिखित ‘बदलता ग्रामीण महाराष्ट्र’ पुस्तकाचे प्रकाशन बुधवारी (ता. २६) पुणे येथे झाले.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे मुख्य प्रशासक विद्याधर अनास्कर, ‘सकाळ माध्यम समूहा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, ‘सकाळ अॅग्रोवन’चे संपादक संचालक आदिनाथ चव्हाण यांच्या हस्ते हे प्रकाशन करण्यात आले.

श्री. गायकवाड यांनी आतापर्यंत एकूण २७ पुस्तके लिहिली आहेत. नुकतेच साखर आयुक्त म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या पहिल्याच पुस्तकाचे प्रकाशन झाले. श्री. गायकवाड यांचे मागील काही महिन्यांपासून ‘सकाळ अॅग्रोवन’ या प्रसिद्ध कृषिविषयक दैनिकातून ‘बदलता ग्रामीण महाराष्ट्र’ या सदराखाली लेखन प्रसिद्ध केले जात आहे.

त्या सर्व भागांमधून महाराष्ट्राचे ग्रामीण जीवन त्यांनी अनुभवले आहे. यामध्ये जमीन धारणा पद्धती, महसूल पद्धती, टपाल व्यवस्था, ग्रामीण खेळ, नोकरशाहीतील बदल, त्याचबरोबर सणवार, धार्मिक संस्था आणि एकूण माणसाचे जगणे कसे बदलले यावर सहजतेने भाष्य करणारे लेखन केले आहे.

प्रकाशित केलेल्या पुस्तकांमध्ये गेल्या शंभर वर्षांत महाराष्ट्र कसा बदलला याचे ललित भाषेत चित्रण केले आहे. महाराष्ट्र समजून घेत असताना पहिले पुस्तक ‘गावगाडा’ हे अत्यंत महत्त्वाचे असून ते आवर्जून वाचले पाहिजे.

या पुस्तकामध्ये लुप्त होतेय शिव आणि पायवाट, बदलते गाव कारभारी, वतनदारी संपुष्टात येताना, बलुतेदारी, गाव चावडीची महिमा, जमीन महसूल म्हणजे काय, कथा भूजलाची, दुष्काळाची दाहकता, दमडी ते रुपया, वशिलेबाजीचे बदलते स्वरूप, दारिद्र्यरेषेचे अखंड प्रेम यासह विवाह पद्धती असो की लोकजीवनातील संक्रमण, बारा बलुतेदारीमधील बदल या महत्त्वाच्या विषयांना स्पर्श करणारे लेखन यात आहे.

प्लेगपासून कोरोनापर्यंत झालेले आरोग्यविषयक बदल, वृत्तपत्रांचे बदलते जग, बदलता प्रवास, पर्यटनाच्या नव्या दिशा, बाजारहाट ते बिग बास्केट या अनेक महत्त्वाच्या मुद्यांद्वारे राज्यात नक्की कसा बदल झाला याचे चित्र यामध्ये मांडले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

GM Crops: जीएम आणि जनुकीय संपादित तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना फायदा होईल का?; तज्ज्ञ म्हणतात...

Chhagan Bhujbal: मराठा आरक्षणाविरोधात छगन भुजबळ न्यायालयात जाणार; कागदपत्रांची बारकाईने पडताळणी सुरू

Shikshanratna Award: डॉ. साताप्पा खरबडे यांचा शिक्षणरत्न पुरस्काराने सन्मान

Poultry Industry : फ्रोझन चिकनवरील जीएसटी हटवण्याची मागणी

UP Kharif Sowing: उत्तर प्रदेशात यावर्षीच्या खरीप हंगामात बंपर पीक उत्पादन अपेक्षित

SCROLL FOR NEXT